Karnataka Rajyasabha Election Sonia Gandhi esakal
देश

मोठी बातमी! सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार? 'या' राज्यातील मुख्यमंत्र्याची विनंती करणार मान्य

कर्नाटकात येत्या आठ महिन्यांत राज्यसभेच्या (Karnataka Rajyasabha Election) चार जागांसाठी निवडणुका होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सोनियांना कर्नाटकातून राज्यसभा सदस्य होण्याचा सल्ला दिला आहे.

बंगळूर : कर्नाटकात येत्या आठ महिन्यांत राज्यसभेच्या (Karnataka Rajyasabha Election) चार जागांसाठी निवडणुका होणार आहेत. काँग्रेसला यावेळी काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना राज्यातून वरिष्ठ सभागृहात निवडून आणायचे आहे, असे बोलले जात आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) त्या लढवणार नसल्यामुळे, कर्नाटकातून राज्यसभा सदस्य होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोनियांना विनंती केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कर्नाटकातील काँग्रेसचे तीन राज्यसभा सदस्य सय्यद नासिर हुसेन, डॉ. एल. हनुमंतय्या आणि जी. सी. चंद्रशेखर यांचा कार्यकाळ पुढील वर्षी २ एप्रिल रोजी संपणार आहे. १३५ आमदार असलेल्या काँग्रेसला तिन्ही जागा राखण्याची संधी आहे. त्यामुळे काँग्रेसने या तीन जागांसाठी आपले प्रतिनिधी पुन्हा निवडण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवंगत राजीव गांधी विरोधी पक्षनेते असताना १०८९ पासून ते राहिलेले १०, जनपथ निवासस्थान कायम ठेवण्यासाठी सोनिया गांधींना राज्यसभा किंवा लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. त्यामुळे सोनियांसह, उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाथे आणि कर्नाटकचे सय्यद नसीर हुसेन यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सोनियांना कर्नाटकातून राज्यसभा सदस्य होण्याचा सल्ला दिला आहे. नेहरू-गांधी घराण्यातील एकही सदस्य संसदेत नसावा यासाठी भाजपची योजना असल्याने काँग्रेस त्यांना सुरक्षित मार्ग देण्याचा विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी नुकत्याच झालेल्या विरोधी पक्षांच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी सिद्धरामय्या यांच्याशी बंगळुरमध्ये चर्चा केली.

दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा यांनाही हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेवर उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. वायनाडचे माजी लोकसभा सदस्य राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आल्याने कुटुंबासाठी हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bala Nandgaonkar: चक्क राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार! बाळा नांदगावकर यांनी का केली ही भविष्यवाणी?

Yavatmal Assembly Election : जिल्ह्यात फुटू शकतात बंडखोरीचे फटाके... दिग्रस, यवतमाळ, पुसद मतदारसंघावरून ओढाताण

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

SCROLL FOR NEXT