Former Home Minister HDR Lyngdoh Passed Away esakal
देश

Assembly Election : निवडणूक प्रचारादरम्यान माजी गृहमंत्र्यांचं निधन; 'या' जागेवरची निवडणूक ढकलली पुढं

एचडीआर लिंगडोह हे निवडणूक प्रचारादरम्यान अचानक बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सकाळ डिजिटल टीम

Meghalaya Assembly Election : मेघालयातील विधानसभा निवडणुकीदरम्यान खासी हिल्स जिल्ह्यातील सोहियोंग विधानसभा (Sohiong Assembly) जागेवरील उमेदवाराच्या मृत्यूमुळं निवडणूक पुढं ढकलण्यात आलीये.

युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाचे (United Democratic Party) उमेदवार आणि राज्याचे माजी गृहमंत्री एचडीआर लिंगडोह यांच्या आकस्मिक निधनामुळं येथील निवडणूक पुढं ढकलण्यात आलीये.

मुख्य निवडणूक अधिकारी एफआर खारकोनगर यांनी सांगितलं की, 'सोहियोंग विधानसभा मतदारसंघातील उमेदवार एचडीआर लिंगडोह (HDR Lyngdoh) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. इथं निवडणूक प्रक्रिया पुढं ढकलली जाऊ शकते.'

एचडीआर लिंगडोह हे निवडणूक प्रचारादरम्यान अचानक बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री संगमा यांनी शोक व्यक्त केला आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचं स्मरण केलं. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून लिहिलं की, 'ज्येष्ठ नेते एचडीआर लिंगडोह यांच्या आकस्मिक निधनानं मला खूप दु:ख झालंय. लिंगडोह यांनी गेल्या काही वर्षांत अनेक पदं भूषवली आहेत. त्यांच्या निधनानं मेघालयचं मोठं नुकसान झालंय. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.'

मेघालयाचे माजी गृहमंत्री लिंगडोह यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. 2018 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, त्यानंतर ते यूडीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. मुकुल संगमा यांच्या सरकारमध्ये ते गृहमंत्री होते. लोक त्यांना 'माहेह' नावानं ओळखत. पहिल्यांदा 1988 मध्ये त्यांनी सोहियोंगमधून निवडणूक जिंकलीये.

मेघालयमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत, त्यापैकी 59 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. मेघालयसोबतच नागालँडमध्येही 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड निवडणुकांचे निकाल 2 मार्चला लागणार आहेत. त्रिपुरातील सर्व 60 जागांसाठी 16 फेब्रुवारीला मतदान झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT