देश

मिल्खा सिंग यांची ऑक्सिजन पातळी घटली, ICUत दाखल

कोरोनाच्या संसर्गामुळं त्यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

चंदीगड : भारताचे माजी स्प्रिंटर मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून आज (गुरुवार) त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानं त्यांना ICUत दाखल करण्यात आलं आहे. आठवड्याभरापूर्वीच मिल्खासिंग यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Former Indian sprinter Milkha Singh admitted in ICU due to dipping levels of oxygen)

गेल्याच आठवड्यात त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली होती

मागच्या आठवड्यात ICUत दाखल केल्यानंतर काही दिवसांत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. कोरोना झाल्यामुळे चंदीगड येथील आपल्या घरातच विलगीकरणात होते. मात्र, अचानक प्रकृती खालावल्यामुळे मोहालीमधील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना चंदीगडच्या PGIMER येथील कोविड हॉस्पिटलमधील ICUतं दाखल करण्यात आलं आहे. त्यांना सध्या वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रा. अशोक कुमार यांनी ही माहिती दिली.

सुरुवातीला नव्हती कोणतीही लक्षणं

९१ वर्षीय मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती मात्र कोणताही लक्षणं नव्हती. त्यामुळे ते घरातच विलगीकरणात होते. मिल्खा सिंग यांच्यानंतर त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांनाही कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिल्खा सिंग आणि निर्मल कौर यांच्यावर एकाच रूममध्ये उपचार सुरू होते.

आशियाई खेळात पाच वेळा मिल्खा सिंग यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 1960 मध्ये रोम येथे झालेल्या 40 मीटर शर्यतीत मिल्खा सिंग चौथ्या क्रमांकावर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT