बेंगलोर : कर्नाटकामधील बेंगलोरच्या एका न्यायालयाने भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांना शिक्षा सुनावली आहे. तब्बल 10 वर्षांपूर्वीच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने त्यांना नुकसानभरपाई सुनावली आहे. एच डी देवेगौडा यांनी 10 वर्षांपूर्वी टीव्हीवरील एका मुलाखतीमध्ये नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरीडोर एंटरप्रायजेस (NICE) च्या विरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी कंपनीला नुकसानभरपाई म्हणून दोन कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.
दिवानी तसेच सत्र न्यायाधीश मल्लनगौडा यांनी एनआयसीई द्वारे दाखल केलेल्या खटल्यावर हा आदेश दिला आहे. या कंपनीचे प्रमुख अशोक खेनी हे बीदर दक्षिणचे माजी आमदार आहेत. एका कन्नड वृत्तवाहिनीवर 28 जून 2011 रोजी प्रसारित झालेल्या एका मुलाखतीचा उल्लेख करत न्यायालयाने अपमानजनक वक्तव्यांमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला नुकसान झाल्याचा ठपका ठेवत देवेगौडा यांना कंपनीला दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.
देवेगौडा यांनी एनआयसीई परियोजनेवर निशाणा साधत ही 'लूट' असल्याचं म्हटलं होतं. कोर्टाने म्हटलं आहे की कर्नाटक हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये हा प्रकल्प सुरू ठेवला आहे. कोर्टाने 17 जूनच्या आपल्या निकालामध्ये म्हटलंय की, कंपनीचा प्रकल्प मोठा असून कर्नाटकच्या हिताचा आहे. कोर्टाने असे म्हटलंय की, भविष्यात अशी अवमानकारक विधाने करण्यास परवानगी दिली गेली तर कर्नाटक राज्याच्या मोठ्या जनहितार्थ अशा मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीस नक्कीच उशीर होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.