नवी दिल्ली - रशिया-युक्रेन युद्धाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी समर्थन केले आहे. मनमोहन सिंग यांनी G20 बैठकीपूर्वी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे विधान केलं.
मनमोहन सिंग म्हणाले की, शांततेचे आवाहन करताना भारताने आपले सार्वभौम आणि आर्थिक हिताला प्राधान्य देण्याचा योग्य निर्णय घेतला. आज जागतिक नेते दिल्लीत एकत्र येत आहेत. त्यामुळे देशांतर्गत राजकारणासाठी परराष्ट्र धोरणाचा वापर न करण्याचा इशाराही सिंग यांनी मोदी सरकारला दिला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2004 आणि 2014 दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या दोन कार्यकाळात पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग शनिवारी G20 डिनरसाठी आमंत्रित केलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. भारताच्या G20 अध्यक्षपदाबाबत बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, त्यांच्या काळाच्या तुलनेत देशांतर्गत राजकारणापेक्षा परराष्ट्र धोरण अधिक महत्त्वाचे झाले आहे. मात्र देशातील पक्षीय राजकारणासाठी परदेशी मुत्सद्देगिरीचा वापर करताना संयम बाळगणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, "माझ्या हयातीत भारताला G20 चे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. G20 शिखर परिषदेत भारताने जागतिक नेत्यांचे यजमानपद भूषवले हे मला पाहायला मिळाल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.