देश

PV Narsimha Rao: अल्पमतातील पंतप्रधानांनी देशाचं भविष्य बदलून टाकलं ! आर्थिक सुधारणांचे जनक पी. व्ही. नरसिंहराव

Bharat Ratna PV Narsimha Rao : राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या झाल्यानंतर उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे देशाची सूत्रे आली. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे स्वीकारली.

सकाळ वृत्तसेवा

स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल विद्यापीठाने काढून टाकले. अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी नागपूर गाठले व तेथील हिस्लॉप महाविद्यालयात प्रवेश घेतला. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातही शिक्षण घेतले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. १९५७ मध्ये त्यांची आंध्र प्रदेशातील मंथानी विधानसभा क्षेत्रातून निवड झाली. याच मतदारसंघातून सलग २० वर्षे ते निवडून गेले. या काळात त्यांनी विविध मंत्रिपदे सांभाळली.

१९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे १९७१ मध्ये त्यांची आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. या काळात त्यांनी भूमी सुधारचे कायदे संमत केले. या कायद्यांनी त्यांची लोकप्रियता वाढली. १९७३ पर्यंत त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळले.

१९७७ मध्ये पहिल्यांदा हनमकोंडा लोकसभा मतदारसंघातून निवड झाली. येथून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. १९८० मध्ये त्यांनी या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली. परंतु याच काळात आंध्र प्रदेशात एनटी रामाराव यांचा राजकारणात प्रवेश झाल्याने त्यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रातील रामटेकची निवड केली.

१९८४ व १९८९ या दोन लोकसभा त्यांनी रामटेकमधून लढविल्या. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात ते संरक्षण मंत्री होते. मराठी भाषेवर प्रभूत्व असल्याने त्यांना मतदारसंघात लोकांशी संपर्क साधण्यात कोणतीही अडचण आली नाही. १९८४ मध्ये राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री, मानव संसाधन मंत्री अशी महत्त्वपूर्ण खाती सांभाळून प्रभावी मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

परंतु १९९१ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नाही. राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या झाल्यानंतर उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे देशाची सूत्रे आली. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे स्वीकारली.

यानंतर त्यांनी १९९१ मध्ये आंध्र प्रदेशातील नंद्याळ या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली. रसातळाला गेलेली भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी उदारीकरणाचे धोरण राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदावर नियुक्ती करून त्यांनी उदारीकरण व जागतिकीकरणाचे धोरणे राबवून देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले.

यामुळे त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणेचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. १९९१ मध्ये त्यांचे सरकार हे अल्पमतातील असताना सुद्धा राजकीय चातुर्यांने त्यांनी पाच वर्षे पूर्ण केली. यामुळे त्यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जात होते.

नरसिंह राव यांच्या कुटुंबीयांत आनंद

करीमनगर (तेलंगण) - आंध्र प्रदेशचे भूमिपुत्र, माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही.नरसिंह राव यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर त्यांच्या करीमनगर जिल्ह्यात आनंदोत्सव झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी सीव्हीआरएन कॉलनीत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. नरसिंह राव यांची पुतणी सुभाषिणी यांनी, ‘उशिरा का होईना भारत सरकारने नरसिंह राव यांना भारतरत्न सन्मान जाहीर केल्याचा खूप आनंद होत आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली.

सुभाषिणी या राव यांचे बंधू माधव राव यांच्या कन्या. सुभाषिणीचे पती संतोष बाबू कालवाकोटा हे पी.व्ही साहित्यपीठम चालवतात. ही एक साहित्य संस्था आहे. ते म्हणाले. ‘नरसिंह राव हे भारतरत्न सन्मानासाठी पूर्णपणे योग्य होते. या क्षणाची आम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होतो. एक ना एक दिवस त्यांना भारतरत्न मिळेल, याची आम्हाला खात्री होती. या सन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT