former Punjab Chief Minister Captain Amarinder Singh denied meeting Sonia Gandhi
चंदीगड- भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली असल्याची बातमी पसरली होती. यावरुन कॅप्टन सिंग यांनी खुलासा केला आहे. त्यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत भेटीचे वृत्त फेटाळले आहे. ही केवळ अफवा असल्याचं ते म्हणाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या भेटीच्या वृत्ताला आधार नसून तो पूर्णपणे खोटा असल्याचं कॅप्टन सिंग म्हणाले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी मी एकनिष्ठ आहे.
मी माझं मन यापूर्वीच बनवलेलं असून आता कायम मी भाजपसोबत असेन. अशा परिस्थितीत आता तुम्ही मागे पाहू शकत नाही. माझा आयुष्याचा एक नियम आहे. जेव्हा मी एखादा निर्णय घेतो, त्यावर मी ठाम राहतो आणि मागे वळून पाहात नाही, असं कॅप्टन सिंग म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात प्रेस नोट रिलिझ केली आहे.
अमरिंदर सिंग यांनी दीड वर्षांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी पंजाब लोक काँग्रेस Punjab Lok Congress (PLC) नावाचा स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष भाजपमध्ये विलिन केला. काँग्रेस पक्षातील नेत्यांसोबत असलेल्या मतभेदामुळे त्यांनी २०२१ मध्ये वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला होता.
सिंग यांनी २०२२ ची पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांना एकही जागा राज्यात जिंकता आली नव्हती.दरम्यान, काँग्रेसने राज्यात आप सोबत लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये खदखद असल्याचे बोलले जाते. प्रताप सिंग बाजवा यांनी २०२४ च्या निवडणुकीत आपसोबत आघाडी करण्यास इच्छूक नसल्याचं म्हटलं होतं. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.