Former Union Minister and BJP MP From Ambala Passes Away Aged 72 in Chandigarh 
देश

PM मोदी यांचे निकटवर्तीय कटारिया यांचे निधन; ७२ व्या वर्षी खासदाराने घेतला अखेरचा श्वास

रतनलाल कटारिया हे गेल्या अनेक दिवसांपासून चंदिगडच्या पीजीआयमध्ये दाखल होते.

धनश्री ओतारी

माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि अंबाला येथील खासदार रतनलाल कटारिया यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. रतनलाल कटारिया हे गेल्या अनेक दिवसांपासून चंदिगडच्या पीजीआयमध्ये दाखल होते.(Former Union Minister and BJP MP From Ambala Passes Away Aged 72 in Chandigarh)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रतनलाल कटारिया यांच्या निधनानंतर हरियाणात शोककळा पसरली आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष ग्यानचंद गुप्ता यांनीही खासदार कटारिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'माजी केंद्रीय राज्यमंत्री, अंबाला लोकसभा खासदार रतनलाल कटारिया यांचे निधन हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे आणि भाजप संघटनेचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे.' अशा शब्दात गुप्ता यांनी शोक व्यक्त केला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने रतनलाल कटारिया यांना तिसऱ्यांदा अंबाला मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. अनुभव आणि जुना चेहरा यामुळे भाजपने कटारिया यांना अंबाला लोकसभा राखीव जागेवरून उमेदवारी दिली. एकाच जागेवरून राज्यसभेच्या खासदार कुमारी सेलजा यांच्याकडून त्यांचा सलग दोनदा पराभव झाला असला तरी 2014 च्या निवडणुकीत त्यांनी विजयाचा विक्रम केला. 1999 मध्येही ते याच जागेवरून खासदार राहिले आहेत.(Marathi Tajya Batmya)

2014 मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राजकुमार वाल्मिकी यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये त्यांनी कुमारी सेलजा यांना हरवून जुन्या पराभवाचा बदलाही घेतला होता. प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि निष्कलंक प्रतिमेमुळे रतनलाल कटारिया यांना पक्षाने तिकीट दिले.(Latest Marathi News)

1980 मध्ये बीजेवायएमचे उपाध्यक्ष बनले

रतनलाल कटारिया यांना 1980 मध्ये BJYM चे राज्य उपाध्यक्ष बनवण्यात आले. यानंतर जून 2001 ते सप्टेंबर 2003 या कालावधीत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, राज्यमंत्री, अनुसूचित जाती मोर्चाचे अखिल भारतीय सरचिटणीस, भाजपचे राष्ट्रीय मंत्री असा प्रवास करून त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले.

1987-90 मध्ये ते राज्य सरकारचे संसदीय सचिव आणि हरिजन कल्याण निगमचे अध्यक्ष बनले. जून 1997 ते जून 1999 पर्यंत ते हरियाणा वेअरहाऊसिंगचे अध्यक्ष होते. 6 ऑक्टोबर 1999 रोजी रतन लाल कटारिया अंबाला येथून खासदार म्हणून निवडून आले. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राजकुमार वाल्मिकी यांचा पराभव करून विजयाचा विक्रम केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

...तर ॲडमिनवरही दाखल होईल गुन्हा! सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ९९ जणांवर कारवाई; सायबर पोलिसांनी हटविल्या ३० पोस्ट; १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT