narendra modi nitish kumar chandrababu naidu 
देश

NDA Government: मोदी सरकार 3.0 चा फॉर्म्युला ठरला! जेडीयू-टीडीपीचे किती असतील मंत्री? छोट्या पक्षांचाही भाव वाढला

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांना सरकार स्थापन करणार आहेत. मागील सरकारमध्ये एनडीएतील घटक पक्षांकडे पाचपेक्षा कमी मंत्रिपद होते. मात्र, या सरकारमध्ये भाजपला एनडीएतील घटक पक्षांना अधिक महत्व द्यावं लागणार आहे. नव्या सरकारमध्ये घटक पक्षाचे १६ ते १८ मंत्री असण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहजिक तेलुगु देसम पार्टी आणि जनता दल संयुक्तला सर्वाधिक मंत्रीपद मिळतील. चार खासदारामागे एक मंत्रीपद असा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. चंद्रबाबूंच्या पक्षाकडे १६ खासदार आहेत, तर नितीश कुमार यांच्याकडे १२ खासदार आहेत. त्यामुळे नायडूंच्या खासदारांना चार मंत्रीपदं तर नितीश कुमार यांना ३ मंत्रीपदं मिळू शकतील. एनडीएतील इतर घटक पक्षांना देखील चांगली मंत्रीपदं मिळू शकतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, जास्त आणि चांगल्या खात्यांसाठी जेडीयू आणि टीडीपीचा भाजपवर प्रचंड दबाव आहे. आरोग्य, शिक्षा आणि ग्रामीण विकास असा खात्यांसाठी टीडीपीकडून भाजपवर दबाव टाकला जात आहे. दुसरीकडे, जेडीयूला देखील महत्त्वाची खाती हवी आहेत. शिवसेना शिंदे गटाला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद देण्याचा विचार सुरू आहे. शिंदे गटाकडे सात खासदार आहेत. एलजेसी पासवान यांच्याकडे पाच जागा आहेत. त्यांना देखील एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. अर्थ , गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही मंत्रीपद भाजप आपल्याकडेच ठेवेल.

जीतनराम मांझी यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. राष्ट्रवादी काँग्रेसला एक राज्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं. ज्या पक्षांकडे दोन-दोन खासदार आहेत, त्या पक्षांना एक राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. इतर अनेक छोटे पक्ष भाजपसोबत आहेत. त्यांना देखील किमान राज्यमंत्री पदाची इच्छा आहे. काही पक्ष स्थानिक असल्याने आणि महत्त्वाचे असल्याने त्यांचा कॅबिनेटमध्ये सहभागी केलं जाऊ शकतं. सध्या यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.

दरम्यान, एनडीएला एकूण २९२ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला २४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. बहुमताच्या आकड्यापासून भाजप दूर असल्याने त्यांना घटक पक्षांची मर्जी सांभाळावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT