Four friends consumed poisonous substances two dead other two battling for life in Bihar Aurangabad district  
देश

दोन सख्ख्या बहिणींसह चार मैत्रिणींनी घेतलं विष, दोघींचा मृत्यू...; औरंगाबाद येथील घटनेने खळबळ

रोहित कणसे

दोन बहिणींसह १८ ते २० वयोगटातील चार मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमधील औरंगाबाद येथे घडला आहे. या प्रकारानंतर दोघींचा मृत्यू झाला असून दोघींवर गया येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गया येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघी बहिणींनी पहिल्यांदा विष घेतलं आणि त्यानंतर त्यांच्या दोन मैत्रिणींनी देखील त्यांच्या पाठोपाठ विष घेतलं.

कुठल्यातरी कारणावरून वैतागलेल्या दोन्ही बहिणींनी घरात विष घेतलं. ही माहिती मिळताच त्यांच्या दोन मित्रीणींनी देखील विष घेतलं. चारही मुलींची प्रकृती खालावल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील सदर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर चौघांना गया येथील अनुग्रह नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (एएनएमएमसीएच) पाठविण्यात आले.

दोन बहिणींपैकी एका बहिणीचा रविवारी गयायेथील एएनएमएमसीएचमध्ये नेत असताना मृत्यू झाला, तर सोमवारी त्यांच्या एका मैत्रिणीचा याच रुग्णालयात मृत्यू झाला. औरंगाबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी मोहम्मद अमानुल्लाखान यांनी सांगितले की, मुलींच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. मुलींच्या या कृत्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या प्रकृतीची वाट पाहत आहोत. सध्या ते माहिती देण्याच्या स्थितीत नाहीत, असेही खान यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण; थांबे, तिकीट अन् मार्ग.. जाणून घ्या सर्वकाही

Warning Pune: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं फुल्ल; नदीपात्रात होणार विसर्ग

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

Akshay Shinde Encounter: ''अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट'' वडिलांची हायकोर्टात धाव, SIT चौकशीची मागणी

Nashik Accident : बसचालकाचा ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर पडला पाय; शिवशाहीने ठोकल्या दुचाक्या

SCROLL FOR NEXT