Ashwini Vaishnaw sakal
देश

Ashwini Vaishnaw : पुण्यात रेल्वेची चार नवी टर्मिनल;केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी हडपसर, शिवाजीनगर, उरळी व खडकी येथे नव्या रेल्वे टर्मिनलची उभारणी करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेच्या विकासासाठी केलेल्या तरतुदींची माहिती देताना केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले, रेल्वेतर्फे या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १५ हजार ९४० कोटी रुपयांची विकास कामे होणार आहेत. यात रेल्वेचे जाळे वाढविणे, सिग्नलींग व्यवस्था मजबूत करणे तसेच गेजमध्ये बदल करण्याच्या कामाला प्राधान्य दिले जाणार आहे. मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मुख्य रेल्वे स्थानकांवर मोठा ताण येत आहे. या शहरांची लोकसंख्या वाढत असल्याने रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या वाढत आहे. यासाठी शहराच्या आसपास नवी टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुण्यात शिवाजीनगर, हडपसर, उरळी व खडकी येथे ही टर्मिनल उभारली जाणार आहेत. या टर्मिनलवरून रेल्वे गाड्या जातील तसेच तेथून सुटणाऱ्या गाड्या पुणे मुख्य रेल्वे स्थानकांवर येतील. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

मुंबईतील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी येत्या पाच वर्षात विविध योजना केल्या जाणार आहे. उपनगरीय वाहतूक सुरळीत करण्यासाठी या उपाययोजना केल्या जाणार आहे. मुंबईतील उपनगरीय वाहतूक सुरळीत करण्यासाठी जवळपास १० प्रकल्प राबविले जाणार आहेत. यात उपनगरीय रेल्वे वाहतुकीसाठी आणखी १०० गाड्या दिल्या जाणार आहे. तसेच दोन गाड्यांमधील १८० सेकंदाची वारंवारिता १५० सेकंद केली जाणार आहे. यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होईल. येत्या पाच वर्षांत मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न जवळपास सुटलेला असेल, असा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला.

१२८ अमृत भारत रेल्वे स्थानके

महाराष्ट्रात १२८ रेल्वे स्थानके अमृत भारत योजनेत उभारणी केली जाणार आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवरील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. राज्यातील सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात ९२९ ओव्हर ब्रिज व अंडर ब्रिजचे कामे सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी दिली.

बुलेट ट्रेनचे काम प्रगतिपथावर

मुंबई व अहमदाबाद या बुलेट ट्रेनचे काम प्रगतिपथावर असून आतापर्यंत ३२० किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई ते अहमदाबाद हे ५०८ किलोमीटरचे काम असून पालघर या भागात जमीन अधिग्रहणाचा प्रश्न आता निकालात निघाला आहे. यासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बुलेट ट्रेनचे मुख्य स्थानक राहणार आहे. महाराष्ट्रात रेल्वेचे अपघात होऊ नयेत, यासाठी कवच प्रणालीचे किती काम झाले आहे, या प्रश्नावर केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. कवचसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षिततेची ४.० चे प्रमाणपत्र रेल्वेला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT