Indian Army 
देश

Jammu-Kashmir: राजौरीत दहशतवाद्यांसोबत धुमश्चक्री! 4 जवान शहीद, दोन अधिकाऱ्यांचा समावेश

या भागात आता पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफनं संयुक्तरित्या शोधमोहिम सुरु केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

राजौरी : जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील कालाकोट भागात सध्या भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरु आहे. दोन्ही बाजूंकडून सुरु असलेल्या या धुमश्चक्रीत 4 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Four Soldiers Killed with two army officers in action during encounter with terrorists In Rajouri Jammu and Kashmir)

कॅप्टन रँकचे अधिकारी शहीद

माध्यमातील वृत्तानुसार, जे अधिकारी या चकमकीत शहीद झाले आहेत ते कॅप्टन रँकचे आहे. सुरुवातीला या चकमकीत एक लष्करी जवान ठार झाल्याचं तसेच तीन जवान गंभीररित्या जखमी झाल्याचं वृत्त होतं. दरम्यान, या तिघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथं उपचारांदरम्यान या तिघांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

अधिक सुरक्षा रक्षकांची कुमक मागवली

राजौरी-पूंचचे डीआयजी राहे हसिब मुघल यांनी सांगितलं की, या भागात काही दहशतवादी लपून बसले असल्याची खात्रीलायक माहिती आमच्याकडं आली आहे. त्यामुळं या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी स्थानिक पोलीस, लष्कराचे जवान आणि सीआरपीएफचे जवान यांनी संयुक्त शोध मोहिम सुरु केली होती. (Marathi Tajya Batmya)

याचवेळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात दोन अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्यानं ते गंभीररित्या जखमी झाले, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अजूनही या भागात गोळीबार सुरु असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मिक्स स्वरुपाची सुरक्षा रक्षकांची कुमक मागवण्यात आली आहे.

राजौरी आणि पूंच भागात पुन्हा शांतता भंग

राजौरी आणि पूंच भाग काही काळापूर्वी शांत राहिला होता. पण आता पुन्हा एकदा या भागात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं आहे. त्यांच्याकडून सातत्यानं जम्मू आणि काश्मीरमधील शांतता भंग केली जात आहे. गेल्याच आठवड्यात ८ दहशतवादी इथल्या गोळीबारात मारले गेले होते. उरी, कुलगाम आणि राजौरीतील बुधाल भागात या चकमकी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT