Narendra Modi Sakal
देश

PM मोदींनी १०० कोटी लसीकरणाबद्दल केलेला 'तो' दावा खोटा

लसीकरण मोहिमेत १०० कोटी लसीकरण पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी आज जनतेशी संवाद साधला.

सुधीर काकडे

कोरोना महामारीशी लढा देण्यासाठी सध्या देशात लसीकरणाची मोहिम सुरु आहे. त्याअंतर्गत होणाऱ्या लसीकरणाच्या आकड्याने आता १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. १०० कोटी लसीकरण पूर्ण झाल्याने केंद्र सरकारकडून ही गोष्ट मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज त्यानिमित्तानं देशाला संबोधित केलंय. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी भारतात १०० कोटी मोफत लसीकरण करण्यात आल्याचा उल्लेख केला. मात्र त्यांचा हा दावा चुकीचा असल्याचं समोर आलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं समोर आलंय. देशातील या १०० कोटी लसीकरणापैकी अनेकांनी आपल्या लसीकरणासाठी पैसे मोजले आहेत. मार्च महिन्यापासून देशात लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली. सुरुवातील या सरकारने मोफत लसीकरण करण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतर नव्या लसीकरण योजनेनुसार राज्य आणि खासगी दवाखान्यांना लस निर्मात्या कंपन्यांकडून थेट लस खरेदी करून लसीकरण करण्याची परवानगी दिली. यावेळी मात्र रुग्णांलयांत लसींची किंमत वाढली. आज देशाला संबोधित करताना त्यांनी 'भारताने १०० करोड लसीकरण पूर्ण केले, तेही पैसे न घेता, मोफत केले.' असं सांगितलं. पंतप्रधान मोदींनी आज केलेल्या भाषणामध्ये ४:५० मीनिटांना हा दावा केला आहे.

सरकारने जून २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेनंतर आपल्या लसीकरण धोरणात आणखी एक बदल करण्याची घोषणा केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "७५टक्के लसीकरण मोफत आणि केंद्राच्या अधीन असेल आणि २५ टक्के लसीकरण खासगी कंपन्यांकडून होईल. "

खाजगी क्षेत्राने खरेदी केलेल्या लसींसाठी, सेवा शुल्क १५० रुपये प्रति डोसवर मर्यादित होते. तर, भारतातील Covishield ची किंमत ७८० रुपये , Covaxin ची किंमत १४१० रुपये आणि Sputnik V ची किंमत ११४५ रुपये आहे .

२१ जूनपासून केंद्र सरकारने सर्वांना मोफत लसीकरण देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यापूर्वी, १८-४५ वयोगटातील लोकांना लसीकरणासाठी पैसे द्यावे लागत होते, तर ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ते विनामूल्य होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT