Covid Vaccine Sakal
देश

देशभरात तरुणांना आजपासून मोफत लस

अठरा वर्षांवरील सर्वांसाठी केंद्रातर्फे लसीकरण

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधी जाहीर केल्याप्रमाणे उद्यापासून (ता. २१) देशातील १८ वर्षांच्यावरील सर्वांना सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये मोफत कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनाही उद्यापासून लागू होणार आहेत. (Free vaccines for youth across the country from monday)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ जूनला जनतेशी संवाद साधताना लसीकरणाची सूत्रे केंद्र सरकारच्या हाती घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, केंद्र सरकारच आता सर्वांसाठी लस खरेदी करून ती राज्यांना मोफत देणार आहे. खासगी रुग्णालयांना बाजारातून २५ टक्के साठा खरेदी करत लसीकरण सुरु ठेवता येणार आहे. येथे शुल्क देऊन जनतेला लस घेता येईल. आतापर्यंत राज्यांना ४५ वयाच्या पुढील नागरिकांसाठीची लसच केंद्रातर्फे मोफत दिली जात होती आणि १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी राज्यांतर्फे लस खरेदी केली जात होती. आता मात्र लसखरेदीत राज्यांचा कोणताही सहभाग असणार नाही. त्यामुळे सर्वांनाच आता सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये लस मिळणार आहे.

लसीकरणाची वैशिष्ट्ये

- राज्यांना लोकसंख्या, कोरोनाबाधितांची संख्या आणि लसीकरणाचा वेग या आधारावर लस मिळणार

- लस वाया घालवणाऱ्या राज्यांना लसपुरवठा कमी

- थेट लसीकरण केंद्रांवर नोंदणी करून लस घेता येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

तो सरळ सरळ खोटं... गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर नीलमने सोडलं मौन; म्हणते- ते सगळं फक्त

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

SCROLL FOR NEXT