Indira Gandhi Yasir Arafat Sakal
देश

G-20 Summit in Delhi: इंदिरा गांधींच्या काळातही दिल्ली संमेलनासाठी सजली होती; पहिल्याच दिवशी मोठे नेते झाले नाराज

या नाराज झालेल्या नेत्याची मनधरणी करण्यासाठी संमेलनाच्या अध्यक्षांना पाचारण करावे लागले.

वैष्णवी कारंजकर

जी-२० च्या १८ व्या शिखर संमेलनाचे आयोजन नवी दिल्लीमध्ये होत आहे. प्रगती मैदानामध्ये तयार करण्यात आलेल्या भारत मंडपम इथं ९ आणि १० सप्टेंबर रोजी या संमेलनाची महत्त्वाची बैठक होत आहे. यासाठी उपस्थित राहणाऱ्या परदेशी पाहुण्यांचं आगमन होऊ लागलं आहे.

दरवर्षी कोणत्याही एका सदस्य देशाकडे या शिखर परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी असते. यावर्षी ही जबाबदारी भारताकडे आहे. भारताच्या अध्यक्षतेखालील संमेलन भव्य आणि यशस्वी व्हावं यासाठी केंद्र सरकारकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. दिल्लीमध्ये या पूर्वीही आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. १९८३ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने सातव्या अलिप्त चळवळ शिखर संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू या अलिप्तता चळवळीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

इंदिरा गांधींनी काय तयारी केली होती?

हे शिखर संमेलन ७ ते १२ मार्च या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. संमेलनाचे महासचिव नटवर सिंह होते. १९८३ साली भरवण्यात आलेल्या या संमेलनामध्ये जवळपास ४००० परदेशी पाहुणे भारतात आले होते. यामध्ये विविध देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि १०० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचा आणि प्रमुख नेत्यांचा समावेश होता. परदेशी पाहुण्यांवर भारताची चांगली छाप पडेल, यासाठी दिल्लीचे उपराज्यपाल जगमोहन यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती.

या समितीने नगरपालिकेच्या मदतीने दिल्लीच्या कायापालटाची सुरुवात केली. दिल्लीच्या प्रमुख जागांचं सुशोभिकरण करण्यात आलं होतं. रस्त्यांची सुधारणाही करण्यात आली, पथदिवेही दुरुस्त करण्यात आले होते. विविध देशांच्या प्रमुख नेत्यांच्या मुक्कामासाठी दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेल्स बुक करण्यात आली होती. या संमेलनाचं आयोजन वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असलेल्या विज्ञान भवनामध्ये करण्यात आलं होतं. हे विज्ञान भवन देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५६ मध्ये युनेस्को कॉन्फरन्ससाठी उभारण्यात आलं होतं. १९८३ चं हे अलिप्तता चळवळ शिखर संमेलन पाहण्यासाठी आणि त्याच्या वार्तांकनासाठी १७०० हून अधिक पत्रकार आले होते.

नाराज होऊन पॅलेस्टाईनचे नेते संमेलनातून बाहेर पडणारच होते...

दिल्लीमध्ये झालेल्या या शिखर संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष क्यूबाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो हे होते. कारण त्यावेळी ते अलिप्ततावादी चळवळीचे अध्यक्ष होते. या संमेलनामध्ये दुपारी कॅस्ट्रो यांनी इंदिरा गांधींकडे अध्यक्षपद सोपवलं. त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी ही जबाबदारी भारताकडे आली..

संमेलनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी पॅलेस्टाईनचे नेते यासिर अराफात यांच्यासह पाच नेत्यांनी भाषण केलं. या संमेलनाचे महासचिव नटवर सिंह यांनी या कार्यक्रमाबद्दल लिहून ठेवलं आहे. त्यांनी सांगितलं की, पॅलेस्टाईनचे नेते संमेलन सोडून जाण्याच्या तयारीत होते. याचं कारण म्हणजे त्यांच्या पूर्वी जॉर्डनच्या प्रशासकांना बोलण्याची संधी देण्यात आली होती.

जेव्हा नटवर सिंह यांना ही गोष्ट कळाली, तेव्हा त्यांनी घाईघाईत पंतप्रधान इंदिरा गांधींना फोन लावला. त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं की यासिर अराफात आज संध्याकाळीच दिल्ली सोडून जाणार आहे. त्यांना असं वाटत आहे की आपला अपमान झाला आहे. नटवर सिंह यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना सुचवलं की त्यांनी लवकरात लवकर अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांची भेट घ्यावी.

इंदिरा गांधी यांनी फिडेल कॅस्ट्रो यांना फोन करून संपूर्ण प्रकरण त्यांना समजावलं आणि विज्ञान भवनामध्ये जाण्याचा आग्रह केला. इंदिरा गांधीही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या. कॅस्ट्रो यांनी यासिर अराफत यांनाही फोन लावून विज्ञान भवनाकडे बोलावलं. या फोननंतर अराफात विज्ञान भवनामध्ये गेले.

तेव्हा कॅस्ट्रो यांनी त्यांना विचारलं की तुम्ही इंदिरा गांधींसोबत मैत्री ठेवू इच्छित नाही का? तेव्हा अराफात त्वरित उत्तरले की तुम्ही मैत्रीबद्दल बोलताय? त्या तर मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. त्यांच्यासाठी मी काहीही करू शकतो. त्यानंतर कॅस्ट्रो अराफात यांना खडसावत म्हणाले की, मग लहान भावासारखं वागा आणि लगेचच संमेलनामध्ये सहभागी व्हा. यानंतर यासिर अराफत पूर्णवेळ संमेलनामध्ये उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT