Gaganyaan Mission esakal
देश

Gaganyaan Mission : अंतराळवीर 3 दिवस राहणार अंतराळात जाणून घ्या काय वेगळं आहे इस्रोच्या गगनयान मोहीमेत

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) 2024 मध्ये गगनयान प्रक्षेपित करणार आहे

सकाळ डिजिटल टीम

Gaganyaan Mission : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) 2024 मध्ये गगनयान प्रक्षेपित करणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. गुरुवारी इस्रोने या मोहिमेत वापरल्या जाणार्‍या प्रणोदन प्रणालीशी संबंधित दोन चाचण्या घेतल्या, त्या यशस्वी ठरल्या. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या अंतराळवीरांना गगननॉट्स म्हटलं जाईल. इस्रोच्या अधिकृत वेबसाइटनुसार, गगनयान मोहिमेअंतर्गत, 3 गगननॉट्सना 3 दिवस अंतराळात पाठवले जाईल आणि समुद्रात उतरवून परत आणले जाईल.

पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर अंतराळात पोहोचण्याचं गगनयानचं लक्ष्य आहे. या मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड करण्याचं काम भारतीय हवाई दलाला देण्यात आलं होतं. या प्रकल्पासाठी 10 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. चांद्रयान-3 नंतर ISRO ची गगनयान मोहीम अनेक अर्थाने भारतासाठी खास असेल, जाणून घ्या गगनयान मोहीम काय आहे, त्याची तयारी कशी सुरू आहे आणि चांद्रयान-3 शी त्याचा काय संबंध आहे.

गगनयान मोहीम काय आहे?

या मोहिमेद्वारे इस्रो पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) मानवयुक्त अवकाशयान पाठवेल. मानवांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यासाठी स्वदेशी क्षमता विकसित करणे हे इस्रोचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या मोहिमेसाठी जाणार्‍या अंतराळवीरांना पृथ्वीवर जशी लाइफ सपोर्ट सिस्टीम असते तशी उपलब्ध करून दिली जाईल, असा दावा इस्रोने केला आहे.

त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. मिशन सुरू करण्यापूर्वी अनेक चाचण्या करून त्यांची सुरक्षा तपासली जाईल. यामध्ये एअर ड्रॉप टेस्ट (IADT), पॅड अॅबॉर्ट टेस्ट (PAT) आणि टेस्ट व्हेईकल (TV) फ्लाइटचा समावेश आहे. अंतराळवीरांना घेऊन जाण्यासाठी ही मोहीम कितपत सक्षम आहे हे या चाचण्यांचे निकालच सांगतील. इस्रोने ट्विट करून यशस्वी चाचणीची माहिती दिली

मोहिमेची तयारी कुठवर आली आहे?

या मोहिमेसाठी अंतराळवीरांची तयारी पूर्ण झाली आहे. इस्रोच्या चांद्रयान-3 ची या तयारीत महत्त्वाची भूमिका आहे. गगनयान कॅप्सूल अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू आहे. चांद्रयान-3 लाँच व्हेईकल मॉड्यूल म्हणजेच LVM-3 (LVM-3) मधून सोडण्यात आले आहे. आता LVM-3 ची सुधारित आवृत्ती गगनयान लाँच करण्यासाठी वापरली जाईल. यामागेही एक खास कारण आहे. खरं तर, गगनयानला अंतराळवीरांसह सोडण्यासाठी जड रॉकेटची आवश्यकता असेल, सध्या देशात LVM-3 पेक्षा जास्त विश्वासार्ह आणि जड रॉकेट नाही.

सध्या LVM-3 च्या यशाचा दर 100 टक्के आहे. हे बऱ्याच ह्युमन रेटेड सिस्टमसह सुसज्ज आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर याचा अर्थ माणसाला अंतराळात नेत असताना रॉकेट किती प्रमाणात प्रमाणात सुरक्षित असावं ? काही अडचण आल्यास रॉकेटने मिशन त्वरित थांबवावं असा त्याचा अर्थ आहे. इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी गगनयानच्या प्रक्षेपण वाहनाचे रेटिंग पूर्ण झाल्याची पुष्टी केली आहे. यामध्ये वापरलेले प्रोपल्शन मॉड्युल, सॉलिड, लिक्विड आणि क्रायोजेनिक मॉड्युल्स तपासण्यात आले आहेत. आता रॉकेटच्या दुसऱ्या भागाची चाचणी सुरू आहे.

मिशन तीन टप्प्यात पूर्ण केले जाईल

गगनयान मोहीम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा मानवरहित असेल. दुसऱ्या टप्प्यात हा रोबोट मिशनवर पाठवण्यात येणार आहे. याचे परिणाम आणि सुरक्षेच्या बाबींवर लक्ष ठेवून सर्व काही सुरळीत झाल्यास तिसऱ्या टप्प्यात तीन अंतराळवीर पाठवले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT