Vande Bharat Express Railway esakal
देश

Railway News : गांधीनगर-मुंबई 'वंदे भारत एक्स्प्रेस' पुन्हा गुरांवर आदळली; दोन महिन्यांत चौथी घटना

काही महिन्यांपूर्वी 'वंदे भारत एक्स्प्रेस' या गाडीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

काही महिन्यांपूर्वी 'वंदे भारत एक्स्प्रेस' या गाडीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता.

मुंबई : गुजरात-मुंबई (Gujarat-Mumbai) दरम्यान धावणारी 'वंदे भारत एक्स्प्रेस' गाडी (Vande Bharat Express Railway) पुन्हा एकदा गुरांवर आदळली आहे. गुरुवारी संध्याकाळी गांधीनगर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या ट्रॅकवर ही गुरं आली होती. रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली.

या घटनेत रेल्वेच्या पुढच्या भागाचं किरकोळ नुकसान झालं आहे. दोन महिन्यांपूर्वी या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून ही चौथी घटना आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर (Sumit Thakur) यांनी सांगितलं की, 'उदवाडा आणि वापी दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 87 जवळ संध्याकाळी 6.23 च्या सुमारास ही घटना घडली. यात रेल्वेच्या पुढच्या भागाचं किरकोळ नुकसान झालं आहे. या घटनेमुळं काही वेळ रेल्वे थांबल्यानंतर सायंकाळी 6.35 वाजता गाडी पुढच्या प्रवासाला निघाली.'

'वंदे भारत एक्स्प्रेस'ची गुरांना धडक देण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. दोन महिन्यांत चार वेळा जनावरांच्या धडकेनं रेल्वेच्या कामकाजावर परिणाम झाला. याचा फटका प्रवाशांनाही बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT