Ganga Vilas Cruise  Sakal
देश

Ganga Vilas Cruise : मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेलं क्रूज बिहारमध्ये अडकलं; प्रशासन सतर्क

या जहाजावर स्वित्झर्लंडचे 31 पर्यटक आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Ganga Vilas Cruise : देशातील सर्वात मोठं गंगा विलास क्रूज बिहारमधील छपरामध्ये अडकल्याचे वृत्त समोर आले आहे. वाराणसीहून आसामधील डिब्रुगडला निघालेल्या या जहाजावर स्वित्झर्लंडचे 31 पर्यटक आहेत. (Ganga Vilas Cruise stuck in Bihar's Chapra due to low water level)

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या क्रूजला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर हे क्रूज वाराणसहीहून आसामधील दिब्रुगडला निघाले होते.

क्रूज बिहारमील छपरा येथे दाखल झाल्यानंतर येथील गंगा नदीतील कमी पाणी पाताळीमुळे अडकले.

दरम्यान, क्रूझ अडकल्याचे समजताच एसडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले असून, नदीची पाणी पातळी कमी असल्याने क्रूझला किनाऱ्यावर आणणे कठीण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी दाखल एसडीआरएफच्या टीमकडून छोट्या बोटींच्या सहाय्याने क्रूजमधील पर्यटकांना बाहेर काढले जात आहे.

छपराचे सीओ सतेंद्र सिंग यांनी सांगितले की, अडकलेल्या क्रूजमधील प्रवाशांना छोट्या बोटींच्या सहाय्याने चिंदर येथे नेण्यात येत आहे.

चिंदर येथे सर्व पर्यटकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. गंगेतील पाणीपातळी कमी असल्याने क्रूझ किनाऱ्यावर आणण्यात अडचण येत असल्याचे ते म्हणाले.

क्रूझची ही आहे खासियत

गंगा विलास क्रूझचा वेग अपस्ट्रीम प्रति तास 12 किलोमीटर आणि डाउनस्ट्रीम 20 किलोमीटर इतका आहे. क्रूझमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आरओ सिस्टीम आहे, तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. याशिवाय क्रुझमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी आणि आवश्यक गरजांसाठी सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT