Gangster Anil Dujana killed 
देश

Anil Dujana Encounter : १८ मर्डरसह ६२ गुन्हे, कोर्टात केलं होतं लग्न; कोण होता अनिल दुजाना? जाणून घ्या

रोहित कणसे

यूपी एसटीएफ (एसटीएफ) ने मेरठ येथे गुरुवार को गँगस्टर अनिल दुजाना एनकाउंटर मध्ये ठार केलं आहे. तो नोएडा च्या बादलपुर पोलिस स्टेशन हद्दीतील दुजाना गावचा रहिवासी होता. तीन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या दुजाना हा आठवड्याभरापूर्वीच जामीनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर तो फरार झाला.

दुजाना विरोधात १८ मर्डरसहित ६२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तो गँगच्या मध्यमातून लूटमार करत असे.

दुजाना गावातील कुख्यात गँगस्टर दुजाना याच्या विरोधात २००२ साली गाझियाबादच्या कवीनगर येथे पहिला गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात हरबीर पवान नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. अनिल दुजाना वर 18 केस आहेत आणि बाकी लूटपाट, खंडणी, जमीन कब्ज़ा आणि आर्म्स एक्ट असे गुन्हे देखील आहेत. शिवाय त्याच्यावर गैंगस्टर आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंदर्गत देखील गुन्हा होता.

अनिल दुजाना याचा दहशत होती त्याने गँगस्टर सुंदर भाटी वर एके-४७ ने गोळीबार केला होता. वेस्टर्न यूपी मध्ये गँगस्टर आणि गँगवॉर संदर्भात सुंदर भाटी आणि नरेश भाटी ही दोन नावे कायम चर्चेत होती. मात्र २००४ साली जिल्हा पंचायत अध्यक्ष नरेश भाटी यांची हत्या सुंदर भाटी गँगने केले. त्यानंतर नरेशचा भाऊ रणदीप आणि भाचा अमित कसाना यांनी हत्येचा बदला घेण्यासाठी अनिल दुजानाची मदत घेतली होती.

लग्न समारंभात सुंदर भाटीची हत्या

२०११ मध्ये नोव्हेंबर महिन्यात सुंदर भाटीची हत्या करणयासीठी तीघांनी सुंदर भाटी याच्या भाच्याच्या लग्नाचा मुहूर्त निवडला. सर्वांसमोर हत्या करून दहशत निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता. रणदीप, कसना आणि दुडाना या गँगने सुंदर भाटी वर एके ४७ ने गोळ्या झाडल्या. पण यातून भाटी वाचला पण या घटनेत तीन लोक ठार झाले.

न्यायालयात केलं लग्न

अनिल दुजानाचे लग्न २०२१ मध्ये पूजा नावाच्या मुलीशी झाला. मात्र याचा किस्सा देखील तेवढाच मजेशीर आहे. एका गुन्ह्यात अनिल दुजाना याला जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. कोर्टाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर साखरपुड्याच्या कागदपत्रावर सही करत त्याने पूजाला अंगठी देखील घातली. या नंतर बागपत येथे राहाणारी पूजा तिच्या कुटुंबियांसोबत घरी परत गेली.

नोयडामध्ये दुजाना याच्यावर ५०००० रुरयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. डिसेंबर २०२१ मध्ये त्याला दिल्ली पोलीसांनी अटक देखील केलं . मात्र नंतर तो फरार झाला. त्याच्यावर नोयडा पोलिसांव्यतिरीक्त बुलंदशहर येथे २५००० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

इंदिरा गांधींना दिली होती धमकी..

अनिल दुजानाच्या दुजाना या गावचे आणखी एका गँगस्टरचे कनेक्शन आहे. कुख्यात गँगस्टर सुंदर नागर उर्फ सुदर डाकू याची ७०-८० च्या दशकातील दिल्ली एनसीआर मध्ये दहशत होती. त्याने तात्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

Pune Crime : प्रेमसंबंधास नकार; समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून मित्राकडून तरुणीची बदनामी

Fact Check: सकाळ माध्यमाच्या नावे व्हायरल होत असलेली 'सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा' ही पोस्ट खोटी

आई झालेल्या दीपिका पादुकोणची उडवली खिल्ली; मग लिहिली त्याहून वाईट कमेंट, नेटकऱ्यांचा संताप अनावर

SCROLL FOR NEXT