नवी दिल्लीः गँगस्टर गोल्डी ब्रार याला केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी लखबीर सिंह यालासुद्धा केंद्राने दहशतवादी घोषित केले होते. हे दोघेही कॅनडामध्ये लपून बसलेले आहेत.
पंजाबमध्ये खंडणी आणि सीमेपलीकडून शस्त्रास्त्रासह अंमली पदार्थांच्या तस्करीमध्येही त्यांचा सहभाग आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डीने त्याची जबाबदारी स्वीकारली होती.
गोल्डी ब्रार हा खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याशी जवळीक ठेवून असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे ब्रार याने यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकी दिली होती.
मुंबईतले काँग्रेसचे नेते तथा मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये गोल्डीने धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलं होतं. आता केंद्र सरकारने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत सरकारने गोल्डी ब्रार याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. सतविंदर सिंह उर्फ गोल्डी हा बंदी घालण्यात आलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल नावाच्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये त्याचा हात असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे. पंजाबमधील प्रसिध्द गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या घडवून आणण्यामागे गोल्डीचा हात असल्याचे मानले जाते. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याला निकटचा सहकारी म्हणूनही तो ओळखला जातो.
'हे' आहेत गुन्हे...
हत्या, हत्येचा प्रयत्न, शस्त्रांची तस्करी आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ब्रार याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केलेली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात त्याच्या ठिकाणांवर तपास संस्थांनी छापेमारी केली होती. गोल्डी हा मूळचा पंजाबमधील मुक्तसर साहेब इथला रहिवासी आहे. सध्या तो कॅनडातील ब्राम्पटन येथे राहत आहे. स्टुडंट व्हिसावर त्याने 2017 साली कॅनडामध्ये पळ काढला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.