महामार्गावरील वाहनांवर निर्बंध घातले. या निर्बंधामुळे मोठ्या स्वरुपात वाहतूक कोंडी झाली. तर काही भागामध्ये पर्यायी मार्गाने वाहने सोडण्यात आली.
बेळगाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाने (Pune-Bangalore National Highway) तब्बल १८ तासांनी मोकळा श्वास घेतला. धारवाड उच्च न्यायालय (Dharwad High Court) खंडपीठाजवळ गॅसगळती वाहनाचा अपघात घडला होता.
त्यासाठी या मार्गावरील वाहतूक बुधवारी (ता. १६) सायंकाळनंतर ठप्प होती. परंतु, या मार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. त्यामुळे गुरुवार (ता. १७) दुपारनंतर वाहतूक पूर्ववत झाली आहे. धारवाड उच्च न्यायालय खंडपीठाजवळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सायंकाळी गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला होता.
गॅस सिलिंडर (Gas Cylinder) वाहन पुलावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन पुलाला जाऊन आदळले. यामुळे गाडीमधून गॅस गळतीला सुरुवात झाली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त करत तातडीने घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
तसेच, महामार्गावरील वाहनांवर निर्बंध घातले. या निर्बंधामुळे मोठ्या स्वरुपात वाहतूक कोंडी झाली. तर काही भागामध्ये पर्यायी मार्गाने वाहने सोडण्यात आली. अग्निशमन दल व पोलिसांनी यशस्वीरित्या गॅस गळती होणारे वाहन बाजूला केले. त्यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडी तब्बल १८ तासांनी सुटली व त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.