Mukesh Ambani Gautam adani Sakal
देश

Gautam Adani Mukesh Ambani : जोरात कमवलं, झटक्यात गमवलं; अंबानी - अदानींना कोट्यवधीचा फटका

केवळ अंबानी अदानीच नव्हे तर एलॉन मस्क, जेफ बेझोस यांच्याही संपत्तीत मोठी घट झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जगातल्या कोट्यधीशांच्या संपत्तीमध्ये मोठी घट झाल्याची माहिती समोर येत आहे. जगातले सर्वात श्रीमंत मानली जाणारी व्यक्ती म्हणजे एलॉन मस्क आणि जगातले चौथे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचीही संपत्ती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे आता या सगळ्या कोट्यधीशांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. कशामुळे बसला आहे हा फटका?

ब्लूमबर्गने दिलेल्या एका अहवालानुसार भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांची नेटवर्थ झटक्यात कमी झाली आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये १७ हजार कोटींच्या आसपास घट झाली आहे. तर टेस्लाचे प्रमुख आणि जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जाणारे एलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये एकाच दिवसात ८५ हजार कोटींची घट झाली आहे. त्यामुळे या कोट्यधीशांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळालं.

कशामुळे होतंय हे नुकसान?

टेस्ला, अदानी गृप आणि अंबानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळेच या उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये घट झाल्याचं समोर येत आहे. केवळ अंबानी अदानीच नव्हे, जगातील दुसरी श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोसचंही ५.९२ बिलियन डॉलरचं नुकसान झालं आहे. मुकेश अंबानी जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहेत. अंबानींची एकूण संपत्ती ८३.६ बिलियन डॉलर आहे. यांच्या संपत्तीमध्ये २४ तासांमध्येत साधारण ९३.७ मिलियन डॉलरची घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

Nashik Police : मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा तैनात; सशस्त्र आयटीबीपीची करडी नजर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

SCROLL FOR NEXT