Gautam Adani  Sakal
देश

Gautam Adani : मार्केटची दिशा बदलणार?; 'या' व्यवसायातही खणखणणार अदानींचं नाणं

अदानींच्या या व्यवसायामुळे मार्केटची दिशा बदलणार असल्याचेही बोलले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gautam Adani Super App : आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आता नव्या व्यवसायात पाउलं ठेवणार आहे. अदानींच्या या व्यवसायामुळे मार्केटची दिशा बदलणार असल्याचेही बोलले जात आहे. गौतम अदानी सुपर अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत असून, या सुपर अॅपमुळे मार्केटचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

सुपर अॅप म्हणजे नेमकं काय?

सुपर अॅप म्हणजे असे अॅप ज्याद्वारे एकाच प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना अनेक सेवांचा लाभ सहज घेणे सोपे होते. सुपर अॅपमुळे खरेदीसाठी ग्राहकांना वेगवेगळ्या अॅपवर जाण्याची गरज भासत नाही.

या सुपर अॅपद्वारे ग्राहकांना किराणा, फॅशन, शिक्षण, राईड, आरोग्यसेवा यासारख्या सेवा एकाच ठिकाणी देण्यासाठी उदयास येत असून ही बाजारपेठ आता काबीज करण्यासाठी अदानींनी पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

पुढील 3-6 महिन्यांत सुरू होणार

विमानतळावरील प्रवाशांना अदानी समूहाच्या इतर सेवांशी जोडण्यासाठी पुढील 3-6 महिन्यांत 'सुपर अॅप' सुरू करण्याची योजना आदानींकडून आखली जात आहे. अदानींचे हे सुपर अॅप एका इन-हाउस स्टार्टअपद्वारे निर्मित असल्याचेही सांगितले जात आहे.

गौतम अदानींना नेमका फायदा काय?

गौतम अदानींचे हे सुपर अॅप अदानींच्या विमानतळांच्या नेटवर्कवरील हवाई प्रवाशांना अदानी समूहाद्वारे प्रदान केलेल्या इतर सेवांशी जोडण्याचे काम करेल. या पद्धतीने या अॅपचे जास्तीत जास्त डाउनलोडर वाढवण्याचा अदानींचा मानस आहे.

कुठून आली सुपर अॅपची संकल्पना

सोशल मीडिया आणि फायनान्सशिवाय ऑनलाइन शॉपिंग, पेमेंट, मनोरंजनासाठी एकाच ठिकाणी सेवा देण्याचे सुपर अॅपचे मॉडेल चीनमधून आले आहे. चीनमध्ये अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड, टेनसेंट होल्डिंग्स लिमिटेड आणि मीटुआन यांनी यापूर्वीच अशा स्वरुपाचे सुपर अॅप लॉन्च केले आहे.

प्रवास खडतर

कोविडच्या काळात जरी अॅप व्यवसाय आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या व्यवसायात जगभरात मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहण्यात आले होते. मात्र, अदानींना सुपर अॅप लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अतिशय खडतर प्रयत्न करावे लागणार आहे. कारण, या क्षेत्रात टाटा समूहाचे Tata Neu आणि मुकेश अंबानीचे JioMart ने ग्राहकांमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्व प्रस्थापित केले आहे.

जागतिक बाजारपेठेतील सुपर अॅप प्लेअर कोण

चीनमध्ये WeChat, Alipay, भारतात Paytm, इंडोनेशियात Goto, सिंगापूरमध्ये ग्रॅब, व्हिएतनाममध्ये Jalo आणि दक्षिण कोरियाचे काकाओसह अनेक लोकप्रिय सुपर अॅप्स आधीच जागतिक बाजारपेठेत अस्तित्वात आहेत. त्यामुळे अदानींच्या येऊ घातलेल्या सुपर अॅपला किती लोकप्रियता मिळते हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT