Gautam Adani become reachest peple in India Sakal
देश

अदाणी आता थेट अंबानींशी भिडणार ? 'जियो'ला मिळणार टक्कर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी हे दोघे उद्योगपती गुजरातचे आहेत. आतापर्यंत दोन्ही उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते. कधीही दोघांमध्ये स्पर्धा नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वीच अदाणी समूहाने पेट्रोकेमिकल क्षेत्रात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे रिलायन्स समूहानेही हरित ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात विविध क्षेत्रात अदाणी आणि अंबानी यांच्यात थेट स्पर्धा होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. (Gautam adani vs Mukesh Ambani face off)

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदाणी लवकरच एका नवीन क्षेत्रात पदार्पण करण्याची शक्यता आहे. सर्व काही नियोजनबद्ध झाले, तर येत्या काही दिवसांत अदाणी समूह मुकेश अंबानींच्या जिओ (Mukesh Ambani) आणि सुनील भारती मित्तल (Sunil Bharti Mittal) यांच्या एअरटेलला टक्कर देण्याची शक्यता आहे.

अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह टेलिकॉम स्पेक्ट्रम मिळविण्याच्या शर्यतीत सामील होऊ शकतो. त्यासाठी कंपनीने नियोजन सुरू केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी कंपन्यांकडून अर्ज मागवले होते, ते सादर करण्याची अंतिम तारीख 8 जुलै होती. यासाठी सरकारकडे 40 अर्ज आले आहेत.

सूत्रांचे दिलेल्या माहितीनुसार दूरसंचार क्षेत्रातील जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीन कंपन्यांनी 26 जुलै रोजी होणाऱ्या स्पेक्ट्रम लिलावासाठी अर्ज केलेले आहेत. तर अर्ज दाखल करणारी चौथी कंपनी अदाणी समूहाची आहे. कंपनीने नुकतेच नॅशनल लाँग डिस्टन्स (NLD) आणि इंटरनॅशनल लाँग डिस्टन्स (ILD) परवाने घेतले आहेत. मात्र, अदानी समूहाने या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. तसेच या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

5G स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी सरकारने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज करणाऱ्यांची माहिती 12 जुलै रोजी सार्वजनिक केली जाणार आहे. सरकार एकूण 72,097.85 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. त्याची किंमत सुमारे 4.3 लाख कोटी रुपये आहे. या लिलावाअंतर्गत खालच्या फ्रिक्वेन्सी बँडमध्ये 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz, मध्यम फ्रिक्वेन्सी बँडमध्ये 3300 MHz आणि उच्च फ्रिक्वेन्सी बँडमध्ये 26 GHz स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT