Ghulam Nabi Azad Rahul Gandhi esakal
देश

Political News : काँग्रेसचा सर्वात वाईट अध्यक्ष कोण? गुलाम नबी आझादांनी उलघडलं गुपित

ज्येष्ठ राजकारणी गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांचं 'आत्मचरित्र' सध्या चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यादरम्यान त्यांनी तत्कालीन हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पाच पानी पत्र पाठवलं होतं.

ज्येष्ठ राजकारणी गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांचं 'आत्मचरित्र' सध्या चर्चेत आहे. या पुस्तकाचं आज (बुधवार) लोकार्पण होत असलं, तरी काँग्रेसच्या (Congress) इतिहासाशी संबंधित अनेक किस्से याआधीच समोर आले आहेत.

यातील एक घटना पक्षाच्या 'सर्वात वाईट' राष्ट्रीय अध्यक्षाशी संबंधित आहे. आझाद यांनी त्यांच्या पुस्तकात 1996 मध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचा उल्लेख केला आहे.

त्यांनी सांगितलं की, 'के करुणाकरन यांच्या निवासस्थानी अनेक नेते एकत्र आले आणि नरसिंह राव (Narasimha Rao) यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा मागण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली. त्यावेळी त्यांनी राव यांना उघडपणे सांगितलं की, ते काँग्रेसमधील सर्वोत्कृष्ट पंतप्रधानांपैकी एक आहेत. परंतु, ते पक्षाचे आजवरचे सर्वात वाईट अध्यक्ष होते.'

आझाद पुढं म्हणाले, 'तुम्हाला संघटनेच्या कामासाठी वेळ आणि रस नाही. त्यामुळंच आमचा निवडणुकीत पराभव झाला. मी बोलत राहिलो आणि राव ऐकत राहिले, असंही त्यांनी पुस्तकात नमूद केलंय.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यादरम्यान त्यांनी तत्कालीन हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पाच पानी पत्र पाठवलं होतं. त्यात त्यांनी पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT