गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. या विषाणूमुळे मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली असून अनेकांनी त्यांच्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. कोणाची आई, कोणाचे वडील, तर काहींचं संपूर्ण कुटुंबच या विषाणूमुळे उद्धवस्त झालं. दररोज अशा अनेक मन हेलावणाऱ्या घटना आपल्या कानावर येत असतात. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. एक मुलगी आपल्या कोरोनाग्रस्त पित्याला पाणी पाजण्यासाठी जीवाचा आकांत करत होती. मात्र, पाण्याचा एक घोट घेतल्यानंतर काही क्षणातच या व्यक्तीचा मृत्यू झाला. (girl trying to give water to covid 19 positive father stopped by mother andhra pradesh)
सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा व तिच्या आई-वडिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मृत्युच्या दारात उभ्या असलेल्या आपल्या वडिलांना पाणी पाजण्यासाठी एक मुलगी प्रचंड धडपड करत आहे. तर, आपल्या मुलीलादेखील कोरोनाची लागण होऊन आपण तिला गमावू या भीतीने तिची आई, वडिलांना पाणी देण्यापासून मुलीला परावृत्त करत होती. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या मनात कालवाकालव झाली असून अनेक जण अस्वस्थ झाले आहेत.
विजयवाडा येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर ते आपल्या मुळगावी श्रीकाकलुम येथे गेले. परंतु, कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना कोणीही गावात प्रवेश दिला नाही. म्हणून, ते गावाबाहेर झोपडी बांधून रहात होते.
५० वर्षीय या व्यक्तीला कोरोनामुळे अचानकपणे त्रास जाणवू लागला त्यामुळे ते झोपडीच्या बाहेर येऊन जमिनीवर लोळण घेऊ लागले. याचवेळी त्यांची १७ वर्षांची मुलगी त्यांना पाणी देण्यासाठी जात होती. मात्र, पतीची ही अवस्था पाहिल्यावर मुलीच्या आईने वडिलांजवळ जाण्यास तिला अडवलं. विशेष म्हणजे कोणताही विचार न करता ही मुलगी आईचा विरोध धुडकावून लावत वडिलांपर्यंत पोहोचली आणि तिने वडिलांना पाणी दिलं. मात्र, काही काळातच त्यांचा मृत्यू होतो.
दरम्यान, हॉस्पिटलमध्ये बेड अव्हेलेबल नसल्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयात जाता आलं नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तसंच या व्यक्तीच्या कुटुंबियांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.