government hospital in Kerala  esakal
देश

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

केरळमधील सरकारी रुग्णालयात एका मुलीच्या जिभेवर शस्त्रक्रिया करून तिचे सहावे बोट काढण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या जिभेला कोणतीही समस्या नसल्याचे पीडित कुटुंबीयांनी सांगितले.

Sandip Kapde

government hospital in Kerala

केरळमधील कोझिकोड येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी गुरूवारी एका 4 वर्षीय मुलीवर बोटाऐवजी जीभेवर शस्त्रक्रिया केल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार मेडिकल कॉलेजच्या मॅटर्निटी अँड चाइल्ड केअर सेंटरमध्ये मुलीचे सहावे बोट काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या तोंडात कापूस दिसल्याने ही चूक उघडकीस आली. या घटनेने वादाची ठिणगी पडल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले.

मुलीचे सहावे बोट काढण्यासाठी तिला दाखल करण्यात आले. मात्र, ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यानंतर तिच्या जिभेवर ऑपरेशन झाल्याचे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. पालकांनी आरोप केला की जेव्हा चौकशी केली तेव्हा डॉक्टरांनी दावा केला की तोंडाच्या आत एक गळू असल्याचे निदान झाले आहे, जिभेची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. मुलीच्या जिभेत कोणतीही समस्या नसल्याचे सांगत कुटुंबाने याचे खंडन केले आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणाला "लज्जास्पद" म्हणून निषेध केला.

या घटनेची दखल घेत केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांना घटनेची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. मुलगी सध्या रुग्णालयात दाखल असून, कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

हॉस्पिटलने यावर आपली भूमिका स्पष्ट केली. आमची चूक झाली, एका दिवसात 2 मुलांची शस्त्रक्रिया करायची होती. त्यामुळे हा प्रकार घडला.

मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले, मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये कोणालाही या अनुभवातून जावे लागू नये. या चुकीमुळे मुलीला काही वाईट परिणाम झाला असेल तर त्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाने घ्यावी.

आयपीसी कलम ३३६ (इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणे) आणि ३३७ (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या कृत्यामुळे दुखापत होणे) यांचा हवाला देऊन मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे डॉक्टरांविरुद्ध पोलिस केस दाखल करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT