Manjo Jarange and Raj Thackeray  
देश

Maratha Reservation : कसे ही बसवा पण मराठा समाजाला आरक्षण द्या; मनसे नेत्याची मागणी

रवींद्र देशमुख

छत्रपती संभाजीनगर - मागील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मध्यंतरी हा मुद्दा मागे पडला होता. मात्र जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आमरण उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या उपोषणामुळे सरकार देखील अडचणीत आलं होतं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावरकर यांची प्रतिक्रिया आली आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले की, आर्थिकरित्या सर्वांना सक्षम करायला हवे. सर्वांच्या घरात चूल पेटायला हवी. आरक्षण देऊन टाका, कुठे अडले आहे. कसे ही बसवा पण आरक्षण द्या. मला आरक्षण नको, ज्यांना हवय त्यांना आरक्षण द्या, असंही नांदगावकर यांनी म्हटलं. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते.

नांदेड दुर्घटनेवर बाळा नांदगावकर म्हणाले की, राज्यात आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था आहे. शासन आणि प्रशासनाने आपले काम करावे. बाथरूम साफ करून घेणे हे नेत्यांचे काम नाही. बाथरूम साफ करायला लावल्याने गेलेली लोक वापस आले का ? लोकांना मदत करायला हवी, अशा शब्दात नांदगावकर यांनी शिंदे गटाच्या खासदाराच्या कृतीवर टीका केली.

लोकसभा निवडणुकीबाबत, नांदगावकर म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर आणि धोत्रे यांच्यावर आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि ग्रामीण भागात मेळावे झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक जिंकायची म्हणून निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. आम्हाला उमेदवार आणावे लागत नाहीत.आमच्याकडे शिकलेले मुले आहेत. राष्ट्रवादी सारखा जहागीरदार पक्ष आमचा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT