Glacial flood threat in India Research by scientists in Britain population sakal
देश

Glacial flood : हिमनदी पुराचा भारतामध्ये धोका

ब्रिटनमधील वैज्ञानिकांचे संशोधन ; जगात सर्वाधिक संख्या

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील सुमारे ३० लाख लोकांना हिमनदी तलावांच्या पुरांचा धोका असून जगात ही संख्या सर्वाधिक आहे, असा निष्कर्ष ब्रिटनमधील न्यूकॅस्टल विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने काढला आहे.

हिमनदी तलावाच्या पुराच्या धोक्याबद्दलचे हे अशा प्रकारचे पहिलेच जागतिक संशोधन आहे. ‘नेचर’ या नियतकालिकामध्ये त्याचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत. जगभरात हिमनद्यांच्या तलावामुळे येणाऱ्या पुराचा दीड कोटी जणांना धोका असल्याचाही इशारा संशोधकांनी दिला आहे.

संशोधकांनी म्हटले आहे, की जगातील हिमनदी तलावांच्या पुराचा धोका असलेल्या लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या भारत, पाकिस्तान,चीन व पेरू या देशांत आढळते. त्यातही भारत व पाकिस्तानातील लोकसंख्या सर्वाधिक आहे. भारतात हिमनदी तलावांच्या पुराचा ३० लाख तर पाकिस्तानात २० लाख लोकांना धोका आहे.

अशा एकूण जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत या दोन देशांतील लोकसंख्या दोन तृतीयांश आहे. आईसलॅंडमध्ये सर्वात कमी २६० जणांना धोका आहे. आशियातील तिबेट पठारासह किरगीझस्तान ते चीनपर्यंतच्या पर्वतमय प्रदेशात जवळपास एक कोटी लोकसंख्याही या संकटाच्या छायेखाली आहे.

संशोधन कसे केले?

संशोधकांनी जगभरात हिमनदी तलावांच्या १,०८९ खोऱ्यांचे तसेच ५० कि.मी. परिसरात राहणाऱ्या लोकांचेही सर्वेक्षण केले. या परिसरांत दीड कोटी लोक राहत असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे, या परिसरातील विकासकामांचीही पाहणी केली. त्यानंतर, या माहितीच्या आधारे त्यांनी हिमनद्यांच्या तलावाच्या संभाव्य पुराच्या धोक्याचा अंदाज वर्तविला. समुदायांची प्रभावीपणे पतिसाद देण्याची क्षमताही तपासली.

हिमनदी तलाव म्हणजे काय?

हवा गरम झाल्यावर हिमनद्या मागे सरकतात आणि त्यातील वितळलेले पाणी पुढील भागात जमा होते व त्यातून तलावाची निर्मिती होते. या तलावाला अचानक पूर आल्यावर मोठ्या प्रमाणावर हिमनग, दगडगोटे व माती वाहून येते.

पुराचा परिणाम काहीवेळा तो १२० कि.मी.पेक्षा अधिक अंतरावर जाणवतो. उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात २०२१ मध्ये ‘फ्लॅश फ्लड’मुळे ८० जणांचा मृत्यू झाला होता. हवामान बदलामुळे १९९० पासून हिमनदी तलावांची संख्या त्याचप्रमाणे, या तलावांच्या परिसरात राहणाऱ्यांची वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT