pramod sawant sakal
देश

Goa Exit Poll : काँग्रेस-भाजपमध्ये पुन्हा चुरस; २०१७ ची पुनरावृत्ती?

स्नेहल कदम

एक्झिट पोल हाती येत असून त्यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी चुरस बघायला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मागील काही महिन्यांपासून देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आगामी संबंधित राज्यातील सत्तेसाठी चढाओढ पाहायला मिळाली. उत्तर प्रदेशातील मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल समोर येत आहेत. यात भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी चुरस बघायला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार गोव्यात काँग्रेसला १६ तर भाजपला १४ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर आम आदमी पक्षाला ४ आणि इतर पक्षांना ६ जागा मिळतील असं म्हटलं आहे.

इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल

भाजप : 14-18

काँग्रेस : 15-20

मगोप : 2-5

इतर : 0-4 (Total seat: 40)

यात गोव्या बद्दल बोलायच झालं तर इथे कोणताही अंदाज लावणं थोडं गडबडीचं होईल. त्याचं कारण गोव्याचा राजकीय इतिहास. हे राज्य कधीच एका पक्षाकडे अनेक काळ स्थिर राहत नाही. म्हणजे 70 च्या दशकात महाराष्ट्रवादी गोमंत पक्ष आणि युनायटेड गोवन्स यांच्यात चुरस असायची. कालांतराने हे राज्य 90 च्या दशकात कॉंग्रेस आणि भाजपकडे सरकत गेलं.

गोव्यात कॉंग्रेसला मोठं केलं ते प्रतापसिंह राणे, रवि नाईक, वेलफ्रेड डिसूझा, लुईजिन्हो फालेरो अशा नेत्यांनी आणि कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी. तर माजी दिवंग मुख्यमंत्री मनोर पर्रीकर यांनी खऱ्या अर्थानं भाजपाला गोव्यात रुजवण्याचं काम सुरु केलं. भाजपाला गोव्यात पसरवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. साधारत: २००२ ला भाजपाला पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांची वर्णी लागली. यानंतर अवघ्या तीन वर्षात म्हणजेच २००५ मध्ये अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढल्याने राज्यातील भाजपा सरकार पडलं. या तीन अपक्षांनी कॉंग्रेसच्या प्रतापसिंह राणेंना पाठिंबा दिला आणि ते त्यावेळचे तत्कालीन कॉंग्रेसचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पुढे तब्बल सात वर्ष म्हणजे २०१२ पर्यंत कॉंग्रेसने गोव्यावर सत्ता गाजवली. पुन्हा २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मनोहर पर्रीकर निवडून आले. आणि तेव्हापासून ते आजतागायत गोव्यात भाजपाची सत्ता आहे.

दरम्यान, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या १३, कॉंग्रेसच्या १७, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ३, गोवा फॉरर्वडला ४ आणि अपक्ष तीन असा एकून ४० जागांचा कोटा होता. त्यावेळी विधानसभेत या एकाही पक्षाला बहुमत मिळालं नव्हत. त्यावेळी कॉंग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंह होते. भाजपाचे प्रभारी नितिन गडकरी होते. त्यावेळी मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून रुजु होते. त्यावेळी बहुमत आणि सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेसनं काहीही हालाचाल केली नाही. त्यावेळी भाजपाने पुन्हा एकदा अपक्षांचा आणि इतर या पक्षांचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलं. यावेळीही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर असेल. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपने इतर पक्षांशी युती केल्यास २०१७ ची पुनरावृत्ती नाकारता येत नाही.

मात्र गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन करण्यासाठी त्याआधी या तीन पक्षांनी अट ठेवली होती. पर्रीकर यांनी केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सीएम म्हणून गोव्याचा कारभार सांभाळावा अशी त्यांची मागणी होती. त्यानुसार पर्रीकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. यानंतर राज्यात भाजप सरकारने २०१९ पर्यंत सत्ता गाजवली. त्यानंतर २०१९ ला तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले आणि गोव्याचा कारभार प्रमोद सावंत यांच्या खांद्यावर आला. प्रमोद सावंत हे भाजपाचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी कॉंग्रेसचे आमदार आणि अपक्ष अशा दहाजण २०१७ पासून कॉंग्रेसच्या एकूण १५ आमदारांनी भाजपात एंट्री केली. पुन्हा २०१९ ला कॉंग्रेसचे १० आमदार एकावेळी भाजपात गेले. त्यामुळे भाजपा सरकार स्थिर झालं त्यांना बहुमत मिळालं. त्यानंतर आजपर्यंत भाजपाने गोव्यात सत्ता गाजवली आहे.

गोव्यातील पक्षीय राजकारण

२०१७ पर्यंत गोव्यात कॉंग्रेस आणि भाजप या दोन बलाढ्य पक्षांत स्पर्धा फिरत होती. मात्र २०१७ मध्ये आम आदमीने गोव्यात एंट्री केली. त्यानंतर २०२२ म्हणजे या वर्षी ममता बॅनर्जींनी गोवा विधानसेभेत उडी मारल्याने राजकारणाला वेगळे वळण मिळाले. दरम्यान या नव्या दोन पक्षांमुळे गोव्यात राजकारणासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. मात्र असे असले तरीही अजूनही गोव्याची सत्ता अजूनही भाजप आणि कॉंग्रेस या दोनच पक्षांच्या भोवती फिरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT