गोव्यात (Goa) अवघ्या २४ तासांत भाजपला (BJP) दोन मोठे झटके बसले आहेत. भाजप नेते आणि उद्योजक प्रवीण झांटे (Praveen Zante) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. ते लवकरच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात प्रवेश करणार आहे. मायेम मतदारसंघाचे आमदार प्रवीण हे भाजप सोडणारे दुसरे नेते आहेत. याआधी गोव्याचे मंत्री आणि आमदार मायकल लोबो यांनीही राजीनामा दिला होता.
प्रवीण यांनी २०१२ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यानंतर २०१७ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी भाजपही सोडला आहे. प्रवीण यांचे वडील हरीश हेही काँग्रेसचे खासदार राहिले आहेत. १९९१ ते १९९६ या काळात ते उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. २०१२ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने प्रवीण यांनी पक्ष सोडला होता.
आता हा पक्ष मनोहर पर्रीकरांच्या (manohar parrikar) काळात होता तो राहिलेला नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सांगण्यावरून मी पक्षात प्रवेश केला होता. तरुणांना रोजगार देण्यात आणि खाणकाम सुरू करण्यात भाजप अपयशी ठरला आहे. माझ्याच विधानसभेतील आश्वासनांची पूर्तता न झाल्याने तरुण निराश झाले आहेत, असे भाजपला सोडचिठ्ठी देत प्रवीण म्हणाले.
गोमंतकच्या मोठ्या नेत्याला भाजपने फोडले
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात प्रवेश करणार असल्याचे प्रवीण (Praveen Zante) यांनी सांगितले. आपल्याला पुन्हा तिकीट मिळणार नाही, याची प्रवीणला कल्पना असावी, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपने अलीकडेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मोठ्या नेत्याला फोडले होते. ज्याच्याकडून एमजीपी मायेम जागेवरून उमेदवारी करण्याचा विचार करत होती.
भाजप सोडणारे प्रवीण चौथे आमदार
अलीकडच्या काळात भाजप सोडणारे प्रवीण हे चौथे आमदार (Four MLAs quit the party) आहेत. त्यांच्याआधी मायकल लोबो यांनी पक्ष सोडला होता. याशिवाय अलिना साल्दान्हा आम आदमी पक्षात, तर कार्लोस आल्मेडा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, मायकल लोबो कोणत्या पार्टीत जाणार आहेत, हे अद्याप उघड झालेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.