नवी दिल्ली : काँग्रेसने (Congress) पाच आमदारांना (MLA) गोव्यातून चेन्नईला हलवले आहे. गोव्यातील (Goa) विधानसभेच्या अधिवेशनानंतर या आमदारांना थेट चेन्नईला (Chennai) पाठवले आहेत. चेन्नईला पाठवलेल्या आमदारांमध्ये कार्लोस फरेरा, संकल्प आमोणकर, युरी आलेमाओ, रुडॉल्फ फर्नांडिस व एल्टन यांचा समावेश आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी हे आमदार आता गोवा विधानसभेत पोहोचणार असल्याचे बोलले जात आहे. (Goa Congress Latest News)
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने (Congress) मोठी कारवाई करीत गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांची पदावरून हकालपट्टी केली होती. पक्षाने त्यांच्यावर आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर भाजपच्या मदतीने पक्षाविरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया (sonia Gandhi) गांधी यांनी मुकुल वासनिक यांना गोव्यात जाण्याची सूचना केली.
पाच आमदार (MLA) ज्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यात लोबो, कामत, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि डेलियाला यांचा समावेश आहे. तर पाच आमदार एल्टन डी कोस्टा, संकल्प आमोणकर, युरी आलेमाओ, कार्लोस फरेरा व रुडॉल्फ फर्नांडिस हे आमच्यासोबत आहेत. सोबतच एक आमदार अलेक्सो सिक्वेरा पक्षाच्या संपर्कात आहे, असे काँग्रेसचे डेस्क प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सांगितले.
आमदारांना २५ कोटी दिल्याचा आरोप
गोव्याचे (Goa) माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांनी पक्षात दोन तृतीयांश फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पक्षाने केला आहे. भाजपने पक्षाच्या आमदारांना भगव्या छावणीत सामील होण्यासाठी २५ कोटी दिले आहेत, असे काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले. भाजपमध्ये सामील होण्याची कोणतीही योजना नाही, असे म्हणत मायकल लोबो यांनी आरोप फेटाळले.
चौकशी व्हायला हवी
किती आमदार अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाच्या चौकशीचा सामना करीत आहे. याची चौकशी व्हायला हवी, असे काँग्रेसच्या ११ आमदारांपैकी काही आमदार भाजपमध्ये सामील होऊ शकतात याबाबत विचारले असता दिग्विजय सिंह म्हणाले. ही लोकशाही नाही तर भाजपची पैसेशाही आहे, असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.