देश

Assembly Election 2022: दिवसभरात कसं पार पडलं मतदान?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आज तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गोव्यात ४० जागांसाठी (Goa Assembly Election), उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Assembly Election) ७० जागांसाठी, तर उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh Assembly Election) दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांसाठी मतदान होत आहे. गोवा लहान राज्य आहे. पण, या निवडणुकीत अनेक पक्षांनी उडी घेतल्याने निवडणूक चुरशीची बनली आहे.

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 60.44 टक्के मतदान झाले.

  • संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गोव्यात 75.29% आणि उत्तराखंडमध्ये 59.37% मतदान झालं आहे, असं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

  • महिलांच्या सुरक्षेसाठी गोव्यात ‘पिंक’ बुथ संकल्पना राबविण्यात आली. हिमाचल प्रदेशानंतर ही संकल्पना राबविणारे गोवा हे दुसरे राज्य ठरले आहे. यावेळी महिलांना गुलाबी रंगाचे कपडे घालून मतदान केले आणि त्यासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केला.

गोवा निवडणूक :

एक वाजेपर्यंत गोव्यात ४४.६२ टक्के मतदान झाले.

उत्तराखंड निवडणूक :

चंबोली जिल्ह्यात दिव्यांगानी मतदान केंद्रावर येत बजावला मतदानाचा हक्क.

११ वाजेपर्यंतची टक्केवारी :

गोवा - 26.63 टक्के

उत्तर प्रदेश - 23.03 टक्के

उत्तराखंड - 18.97 टक्के

उत्तराखंड निवडणूक :

आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमदेवार कर्नल अजय कोठियाल यांनी बजावला मतदानाचा हक्क

गोवा निवडणूक :

आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अमित पालेकर यांनी आईसह बजावला मतदानाचा हक्क. तसेच काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबो यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

९ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी :

गोवा - 11.04 टक्के

उत्तर प्रदेश - 9.45 टक्के

उत्तराखंड - 5.15 टक्के

गोवा निवडणूक :

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावतं यांनी मतदानाचा हक्क बजावला. गोव्यात भाजपला बहुमत मिळणार आहे. त्यामुळे अपक्ष लढणारे उत्पल पर्रीकर आणि काँग्रेसचे मायकल लोबो यांचा पराभव निश्चित आहे, असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

उत्तराखंड निवडणूक :

उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार पुष्करसिंह धामी यांनी बजावला मतदानाचा हक्क. उत्तराखंडमध्ये आम्ही विकास योजना राबवल्या आहेत. त्यामुळे उत्तराखंडची जनता आम्हाला ६० पेक्षा अधिक जागा देतील, असा विश्वास धामी यांनी व्यक्त केला.

गोवा निवडणूक :

दिवंगत ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी पणजीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

उत्तर प्रदेश निवडणूक :

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी रामपूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्का बजावण्यासाठी रांगेत उभे असलेले दिसून आले.

गोव्यातील लोक सहकार्य करत आहेत. इथं कोणतेही मोठे राजकीय संघर्ष नाहीत. निवडणुका शांततेत होतील. यासाठी भारतीय निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्ष कौतुकास पात्र आहेत. यावर्षी मला अधिक लोक मतदान केंद्रावर येतील अशी अपेक्षा आहे, असं गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई म्हणाले.

उत्तराखंड निवडणूक :

आज सकाळी ८ वाजतापासून ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली.

गोवा निवडणूक :

आज सकाळी पंतप्रधान मोदींनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या. मला पूर्ण विश्वास आहे की भाजप 22 पेक्षा अधिक जागा जिंकेल. भाजपने 10 वर्षात पायाभूत सुविधांचा विकास केला आणि पंतप्रधान मोदींच्या कार्याचा शंभर टक्के बहुमत मिळविण्यासाठी नक्कीच फायदा होईल, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

गोवा निवडणूक : हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी वास्को द गामा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक ७ वर मतदान केले.

गोव्यात ४० जागांसाठी, तर उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांसाठी आज सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. उत्तराखंडमध्ये सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT