नवी दिल्ली : जगात आणि देशात सध्या कोरोनाचा संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या सुरु असणारी दुसरी लाट अद्याप ओसरली नसल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. कोरोनासोबतच्या या लढ्यामध्ये सध्या लसीकरणाचं अस्त्र वापरलं जातंय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आसाम राज्याचे मंत्री चंद्र मोहन पटोवारी यांनी सध्या एक विचित्र वक्तव्य केलं आहे.
त्यांनी आज शुक्रवारी असा दावा केलाय की, कोरोना संक्रमण आणि त्यातून होणारे मृत्यू हे सगळे ईश्वराद्वारे बनवल्या गेलेल्या एका सुपर कॉम्प्यूटरच्या माध्यमातून होत आहेत. आणि हे आधीपासूनच निश्चित होते. पुढे त्यांनी म्हटलंय की, प्रकृतीने निश्चित केलंय की कोण संक्रमित होणार आहे आणि कोण होणार नाहीये, तसेच कुणाला पृथ्वीपासून दूर नेलं जावं. हे सगळं देवाच्या सुपर कॉम्प्यूटरच्या माध्यमातून होत आहे. हा कॉम्प्यूटर मानवनिर्मित नाहीये. या कॉम्प्यूटरने दोन टक्के मृत्यूदरासोबतच कोरोना व्हायरसला पृथ्वीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रमोहन पटवारी हे आसाम सरकारमधील मोठे मंत्री आहेत. त्यांच्याकडे सरकारमधील तीन महत्त्वाची खाती आहेत. परिवहन मंत्र्यांसोबत ते उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारीही ते सांभाळत आहेत. चंद्र मोहन पटवारी यांनी गेल्या बुधवारी कोरोनामुळे मरण पावलेल्या विधवांना मदत करणाऱ्या कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेवर टीका करताना पटवारी म्हणाले की, लाखो डॉलर्स खर्च करून आणि सर्वप्रकारचं संशोधन करूनही कोरोनासारख्या ‘लहान विषाणू’वर उपाय शोधण्यात अपयश आलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.