टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी गेले काही महिने अत्यंत निराशाजनक राहिले आहेत. अनेक मोठ्या आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. प्रसिद्ध आयटी कंपनी Google ने भारतातील कंपनीच्या विविध विभागातील सुमारे 450 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची माहिती मिळाली आहे.
अचानक सुरू झालेल्या या टाळेबंदीमुळे अनेक कर्मचार्यांचे मन दुखावले आहे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या आणि गुगले कामावरून कमी केलेल्या एका कर्मचाऱ्याने लिंक्डइनवर आपला अनुभव शेअर केला आहे.
हा कर्मचारी गुगल कंपनीत डिजिटल मीडियासाठी वरिष्ठ सहयोगी म्हणून काम करत होता. त्याला गुगलने एका मेलद्वारे काढून टाकल्याची बातमी दिली. त्यावर तो म्हणतो की, ‘शनिवारी सकाळी जेव्हा मला माझ्या फोनवर पॉप-अप ईमेल नोटिफिकेशन मिळाले तेव्हा माझ्या हृदय क्षणासाठी धडधडणे बंद झाले. कारण, हा ईमेल Google च्या ऑफिसमधून होता.
तो मेल पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण, काही दिवस कर्मचारी कपात ही गोष्ट कानावर पडत होती. पण ती गोष्टी मलाही सहन करावी लागेल असे वाटले नव्हते. कारण, मला दोनवेळा ‘परफॉर्मर ऑफ द मंथ’ मिळाला होता.
माझा मागिल 2 महिन्यांचा पगार अर्धाच जमा झाला आहे. माझे आर्थिक नियोजन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. तो मेल मला मिळून आता दोन दिवस उलटले आहेत. या दोन दिवसात मी पूर्णपणे संपलो आहे. लिंक्डीनवर येण्यासाठी ते धैर्य जमवण्यासाठी मला दोन दिवसांचा कालावधी लागला. आता मला माझ्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल.
Google च्या या माजी कर्मचाऱ्याने लिंक्डीनवर लोकांना जॉब्स सुचवण्यासाठी अवाहन देखील केले आहे. तो पुढे म्हणतो की, लोकांनी मला सपोर्ट करत चांगला जॉब सुचवला तर मला एखादी चांगली संधी मिळू शकेल.
जानेवारीमध्ये अल्फाबेट इंकने जाहीर केले होते की ते सुमारे 12,000 लोकांची कपात करणार आहेत. म्हणजे त्यांच्या सध्याच्या कर्मचार्यांपैकी सहा टक्के लोकांना नारळ दिला गेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.