Google Office Google
देश

Google: सीसीआयने गुगलला ठोठावला 1337 कोटींचा दंड; कारण...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारतीय स्पर्धा आयोगाने (Competition Commission of India) गुगलला १,३३७.७६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अँड्रॉइड मोबाइल डिव्हाइस क्षेत्रात बाजारपेठेतील आपल्या बलाढ्य शक्तीचा गैरवापर केल्याबद्दल सीसीआयने हा दंड ठोठावला आहे. शिवाय आघाडीच्या इंटरनेट कंपनीला अनुचित व्यावसायिक कारवाया थांबविण्याचे निर्देशही दिले आहेत.

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) ट्विट केले की, "अँड्रॉइड मोबाइल डिव्हाइस इकोसिस्टममधील अनेक बाजारपेठांमध्ये आपल्या स्थितीचा गैरवापर केल्याबद्दल गुगलला दंड ठोठावण्यात आला आहे.

गुगल अँड्रॉइड ओएस (अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम) चालवते आणि व्यवस्थापित करते. शिवाय त्याच्या इतर मालकीच्या ऍप्सला परवाने देते. मूळ उपकरणे उत्पादक (ओईएम) त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर या ओएस आणि गुगलच्या अॅप्सचा वापर करतात. यानुसार ते मोबाइल अॅप्लिकेशन डिस्ट्रिब्युशन अॅग्रीमेंट (एमएडीए) बरोबर आपले हक्क आणि जबाबदाऱ्या नियंत्रित करण्यासाठी अनेक करार करतात.

सीसीआयने गुगलविरूद्ध बातम्यांच्या सामग्रीच्या संदर्भात महसूल सामायिकरणाच्या अन्यायकारक अटींबद्दल तपशीलवार चौकशीचे आदेश दिले होते. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या या आदेशात सीसीआयने म्हटले होते की, या संदर्भात तपास शाखेचे महासंचालक (डीजी) आता एकत्रित तपास अहवाल सादर करतील. न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनने तक्रार दाखल केल्यानंतर गुगलविरोधातील हे आदेश आले आहे.

सर्च इंजिनचे निकाल असलेल्या पेजवर आपल्या 'वेबलिंक्स'ला प्राधान्य देण्यासाठी आपल्या सदस्यांना गुगलला न्यूज कंटेंट देण्यास भाग पाडले जाते, असा आरोप न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनने केला होता. तक्रारीनुसार, गुगल आपल्या सदस्यांचा कंटेंट पुरेशा मोबदल्याशिवाय मोफत वापरते. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात सीसीआयने डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुगलविरोधात चौकशीचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT