government advisory to tv channels amid Ukraine russia war delhi violence and loudspeaker controversy  
देश

'नियमांचे काटेकोर पालन करा, अन्यथा…'; केंद्राची TV चॅनल्सना ॲडव्हायझरी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Union Ministry of Information & Broadcasting) रशिया-युक्रेन कव्हरेज, जहांगीरपुरी हिंसाचार आणि भोंगे या विषायावर घेण्यात आलेल्या टिव्ही डिबेट शो बााबत नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच वृत्तवाहिन्यांना ॲडव्हायझरी जारी करून प्रक्षोभक, लोकांच्या भावना भडकवणारे हेडलाईन देणे टाळण्यास सांगितले आहे. तसेच केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेटरी ॲक्ट) 1995 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे केंद्राने म्हटले आहे.

या नियमांचे पालन न केल्यास अशा चॅनलवर बंदी घातली जाऊ शकते, असा गंभीर इशारा सरकारडून देण्यात आला आहे. या ॲडव्हायझरीत म्हटले आहे की, टेलिव्हिजन नेटवर्क्स (रेग्युलेशन) कायदा, 1995 चे कलम 20 केंद्राला टीव्ही चॅनेलविरुद्ध योग्य पावले उचलण्याचा अधिकार देते. कोणत्याही टिव्ही चॅनलने वर दिलेल्या नियमांचे पालन केले नाही, तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे ॲडव्हायझरीत नमूद करण्यात आले आहे.

जहांगीरपुरी घटना आणि त्यादरम्यान विविध टिव्ही चॅनेलवर झालेल्या चर्चासत्रांवर आक्षेप घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टीव्ही चॅनेल्सना ही ॲडव्हायझरी जारी केली. दरम्यान, विविध मुद्द्यांवर टीव्ही चॅनेल्समध्ये सामाजिक वातावरण बिघडवणारे, दिशाभूल करणारी तसेच सनसनाटी आणि अस्वीकारार्ह भाषा वापरली जात असल्याचा पुनरुच्चार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केला.

युक्रेन-रशियाबद्दलचे खोटे दावे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या नावावर वारंवार चुकीच्या बातम्य देणे. तसेच काहीही संबंध नसलेल्या मथळे देऊन प्रेक्षकांना उत्तेजित करण्यासाठी वाटेल तशा, उपहासात्मक गोष्टी सादर केल्या. जहांगीरपुरी प्रकरणासंदर्भात जातीय हिंसा भडकावणारे प्रक्षोभक मथळे आणि व्हिडिओ दाखवले गेले. यासोबतच योग्य पडताळणी न केलेले सीटीव्ही फुटेजही दाखविण्यात आले.

तसेच काही विशिष्ट जाती-धर्माचे व्हिडिओ दाखवून जातीय तेढ वाढवण्याला हवा देण्यात आली. खोडसाळ आणि खळबळजनक हेडिंग आणि सरकारच्या कारवाईला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. टिव्हीवर चालणाऱ्या बातम्या व चर्चेदरम्यान, काही वृत्तवाहिन्यांनी चिथावणीखोर भाषा वापरली, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. जातीयवादी भाष्य करून जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरकारने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून, अशा गोष्टी टाळाव्यात, अशा सक्त सूचनाही दिल्या आहेत. डिबेट शोमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमादरम्यान लाऊडस्पीकरबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दलही केंद्राने नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT