काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'बुली बाई' ॲप (Bulli Bai App) बाबतचा वाद चव्हाट्यावर आला होता.या ॲपवर मुस्लीम महिलांची फोटो अपमानास्पद पद्धतीने शेअर केली जात असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे. मात्र यानंतर आता सरकारने एका हिंदू महिलांचे अश्लील फोटो शेअर करणाऱ्या एका टेलिग्राम चॅनलला (Telegram Channel) ब्लॉक केले आहे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.
बुली बाई ॲपचा वाद सोशल मीडियावर पसरल्यानंतर आणि लोकांनी मुस्लिम महिलांना लक्ष्य केल्याबद्दल देशातील उजव्या विचारसरणीच्या गटांवर टीका सुरू केल्यानंतर, सोशल मीडिया वर हिंदू महिलांना टारगेट करणारे ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल हायलाइट करण्यास सुरुवात केली. बुल्लीबाई प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या झटपट अटकेनंतर लोकांनी हिंदू महिलांचा ऑनलाइन छळ रोखण्यासाठी कोणतीही पावले का उचलली जात नाहीत असा प्रश्न विचारणे सुरु केले.
महिलांचे अश्लील फोटो आणि द्वेषपूर्ण मेसेज पसरवल्याबद्दल 'हिंदू रंडीया' नावाच्या चॅनलसंबंधी राग व्यक्त केला गेल्यानंतर आता हे टेलिग्राम चॅनल ब्लॉक करण्यात आले आहे. दरम्यान चॅनेल ब्लॉक केले असून, भारत सरकार कारवाईसाठी राज्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे, असे ट्विट आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. हे टेलिग्राम चॅनल कोणी तयार केले आणि पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
'बुली बाई' ॲप प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी उत्तराखंडमधून आणखी एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. मयंक रावल (21) नावाच्या विद्यार्थ्याला बुधवारी पहाटे उत्तराखंडमधून अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याप्रकरणी मुख्य आरोपी श्वेता सिंग (19) हीला उत्तराखंडमधून आणि अभियांत्रिकीचा विद्यार्थी विशाल कुमार झा (21) याला बेंगळुरूमधून अटक केली होती.
'गिटहब' या ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मवर 'बुल्ली बाई' ॲपवर शेकडो मुस्लिम महिलांची बनावट छायाचित्रे अपलोड केल्याच्या तक्रारींनंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. दरम्यान मुंबई सायबर पोलीसांनी अज्ञात असलेले अॅपचे डेव्हलपर्स आणि त्याची जाहिरात करणाऱ्या ट्विटर हँडलविरोधातही गुन्हा दाखल केला.
प्रत्यक्षात असा कोणताही 'लिलाव' किंवा 'विक्री' झाली नव्हती परंतु या ॲपच्या माध्यातून महिलांना अपमानित करणे आणि त्यांना धमकावण्याचा हेतू या ॲपचा असल्याचे समोर आले होते. यातील अनेक महिला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.
दोन्ही प्रकरणे सारखीच
या दोन्ही प्रकरणांमध्ये महिलांना त्यांचे फोटो कसे व्हायरल झाले याबद्दल काहीही माहिती नाही. काही अज्ञातांनी LinkedIn, Twitter इत्यादी सोशल मीडिया साइटवरून फोटो चोरून खोट्या प्रोफाइल बनवल्या असू शकतात किंवा त्यांचे फोटो मॉर्फ केले असू शकतात. नंतर या महिलांना ऑनलाइन त्रास देण्यासाठी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. धर्म किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेगळे असले तरी या दोन्ही प्रकरणांमध्ये एकच पध्दत वापरण्यात आली आहे.
बुली बाई प्रकरणात लिंक्डइन आणि ट्विटर सारख्या साइटवरून मुस्लिम समुदायातील यशस्वी आणि प्रभावशाली महिलांचे फोटो गोळा केले आणि GitHub वर बुली बाई नावाचे अॅप तयार केले. त्या अॅपद्वारे, “Your Bulli Bai of the Day” या कॅप्शनसह महिलेचे फोटो दाखवण्यात आले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.