Priyanka Gandhi Sakal
देश

बुरशीचा सामना करण्यासाठी सरकार गंभीर नाही - प्रियांका

काळ्या बुरशीच्या मुकाबल्यासाठी केंद्र सरकार पुरेसे गंभीर नसल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज केला आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - काळ्या बुरशीच्या (Black Fungus) मुकाबल्यासाठी केंद्र सरकार (Central Government) पुरेसे गंभीर (Serious) नसल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आज केला आहे. तसेच, या आजाराचा ५० टक्के मृत्यूदर आणि उपचारावर होणारा लाखो रुपयांचा खर्च पाहता रुग्णांवर केंद्र सरकारने काळ्या बुरशीच्या मोफत उपचार (Free Treatment) करावेत, अशी मागणीही प्रियांकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (Narendra Modi) केली आहे. (Government is not Serious about Combating the Fungus Priyanka Gandhi)

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करताना म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या लापोसोमाल अॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शनच्या टंचाईकडे लक्ष वेधले आहे. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात या इंजेक्शनची मागणी वाढली आहे.

दिल्लीच्या लष्करी रुग्णालयालाही इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी तुम्ही त्वरित निर्णय घ्यायला हवा. परंतु या आजाराबाबत सरकारचे वर्तन पुरेसे गंभीर नाही. रुग्णांच्या संख्येच्या प्रमाणात राज्यांना दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनचे प्रमाण अल्प आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. काळ्या बुरशीच्या रुग्णांच्या संख्येवरही त्यांनी सवाल केला. कोरोनाच्या रुग्णांची संख्या जाहीर होते पण काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या का सांगितली जात नाही, अशी विचारणा त्यांनी केली.

रोगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही

देशात २२ मे पर्यंत काळ्या बुरशीचे ८८४८ रुग्ण होते. २५ मेस ही संख्या ११७१७ झाली. तीन दिवसात २८६९ रुग्ण वाढले. तब्बल ५० टक्के मृत्यूदर असलेल्या या गंभीर रोगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या रोगाच्या उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनवर होणारा लक्षावधी रुपयांचा खर्च पाहता इंजेक्शन मोफत द्यावे किंवा काळी बुरशीच्या आजाराचा समावेश आयुष्यमान भारत योजनेमध्ये करावा, अशी मागणीही प्रियांका गांधी यांनी केली. याआधी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनीही काळ्या बुरशीवर मोफत उपचारासाठी केंद्राला आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT