PM Modi Speech Esakal
देश

PM Modi Speech: ओबीसी बांधवांसाठी मोदींची मोठी घोषणा, जाणून घ्या काय आहे विश्वकर्मा योजना?

अंकिता खाणे (Ankita Khane)

देश आज 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं. पंतप्रधानांची ध्वजारोहण करण्याची ही 10 वी वेळ आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संपूर्ण देश उत्साहात आहे. यासोबतच दिल्लीपासून जम्मू-काश्मीरपर्यंत सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांवर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक विषयांनर भाष्य केलं आहे. मणिपूपमध्ये सुरू असलेला हिंसाचार, पुढील एक हजार वर्षांवर, जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची संधी, महागाई यासह अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं आहे. तर यावेळी त्यांनी ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

'ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू होणार आहे. या योजनेचा फायदा अनेकांना होईल. देशातील योजनांचा फायदा लाखों लोकांना झाला आहे. पारंपारिक कौशल्य असलेल्यांसाठी पुढील महिन्यात सरकार 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या वाटपासह विश्वकर्मा योजना सुरू करेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली आहे.

या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या वस्तू तयार करणाऱ्यांना आर्थिक साह्य केलं जाणार आहे. प्रशिक्षण, अनुदान आणि तांत्रिक साह्य केलं जाणार आहे. लोहार, सुतार, कुंभार अशा विश्वकर्मांसाठी ही योजना राहणार आहे. विश्वकर्मा समाजाअंतर्गत १४० जाती येतात. या योजनेच्या घोषणेमुळे २०२४ च्या निवडणुकीत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसारख्या राज्यात याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

Jarange Health Update: उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांनी केल्या कडक शब्दांत सूचना

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

IND vs BAN: अ‍ॅक्शन रिप्ले! Rohit Sharma दुसऱ्या डावातही फसला; एकाच पद्धतीने पुन्हा OUT झाला, जैस्वालही गंडला

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्सने 1400 अंकांनी वाढला, निफ्टी 25,800च्या वर

SCROLL FOR NEXT