'तुमचा जन्म केरळमध्ये झाला नाही, तरीही तुम्ही मल्याळी कसे दिसता?'
मी इथल्या लोकांपेक्षा चांगलं मुंडू (धोती) बांधू शकतो, असं केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Kerala Governor Arif Mohammad Khan) यांनी म्हटलंय. आरिफ खान यांनी सत्ताधारी पक्षाची खिल्ली उडवत हे वक्तव्य केलंय.
राज्यपाल म्हणाले, केरळमध्ये काही गोष्टी घडल्या आहेत. मात्र, त्या घडायला नको होत्या. पण, अशा गोष्टींबद्दल आपण जास्त विचार करू नये. खरी समस्या ही आहे की, आरिफ खान केरळमध्ये जन्माला आलेला नाही. पण, तो इथल्या लोकांपेक्षा चांगलं धोतर नेसू शकतो. कधी-कधी लोक विचार करतात की, तुमचा जन्म केरळमध्ये झाला नाही तरीही तुम्ही मल्याळी कसे दिसता. पण, मला याचा अभिमान आहे. मी स्वतःला मल्याळी समजतो, असंही त्यांनी नमूद केलं.
केरळचे राज्यपाल आणि राज्य सरकार यांचं नातं वेगळं सांगायला नको. अनेकदा दोघंही एकमेकांवर हल्ले करत असतात. केरळ विद्यापीठांच्या कुलगुरूंबाबत या महिन्यात एक अध्यादेश जारी करण्यात आला होता. यामध्ये राज्यपालांना राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू पदावरून हटवण्यात आलं आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरोधात आरिफ खान आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
राज्यपाल म्हणाले, 'विद्यापीठांमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. सीपीएमनं विद्यापीठात अनेकांची नियुक्ती केलीय. या लोकांना बेकायदेशीरपणे नियुक्तीपत्र देण्यात आलं होतं, जे न्यायालयात प्रलंबित आहे. विद्यापीठांची स्वायत्तता अबाधित राहावी आणि विद्यापीठाच्या कामकाजात सरकारनं कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये, असा माझा प्रयत्न आहे. केरळनं नेहमीच भारतीय एकतेचं प्रतिनिधित्व केलं आहे. याचा मला अभिमान आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.