नवी दिल्ली : अत्यावश्यक औषधांच्या किंमती केंद्र सरकारनं वाढवलेल्या नाहीत. या औषधांच्या किंमतींवर सरकारचं कोणतंही नियंत्रण नसतं, असं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिलं आहे. औषधांच्या किंमतीत वाढ होत असल्यानं त्यावरुन केंद्र सरकारवर टीका होत होती, त्यामुळं हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (govt has no control over prices of essential medicines Explanation of Mansukh Mandiviya)
मांडवीय म्हणाले, कोणत्याही अत्यावश्यक औषधांच्या किंमती केंद्र सरकारनं वाढवत नाही. अशा औषधांच्या किंमती या घाऊक किंमत निर्देशांकावर अवलंबून असतात. जर हा निर्देशांक वर गेला तर अत्यावश्यक औषधांच्या किंमती वधारतात तर हा निर्देशांक खाली गेल्यास किंमतींतही घट होते. त्यामुळं सरकार अत्यावश्यक औषधांच्या किंमती नियंत्रित करत नाही.
फार्मा क्षेत्रात आपल्या देशाला आत्मनिर्भर होण्याासाठी फार्मा विभागानं प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना जाहीर केली आहे. स्थानिक उत्पादकांच्या प्रोत्साहनासाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एकूण ४९ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यांपैकी ८ प्रकल्प आधीच सुरु झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.