Corona Vaccine Corona Vaccine
देश

Precautionary डोसची आठवण करुन देणारा येणार SMS: आरोग्य मंत्रालय

सकाळ डिजिटल टीम

नवीन वर्षातील 10 जानेवारीपासून संपूर्ण लसीकरण (Complete Vaccinated People ) केलेले आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन (Health Workers & Front Line Workesr ) कर्मचारी तसेच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सह-व्याधी असलेल्या नागरिक बूस्टर शॉट्ससाठी नोंदणी करू शकतात, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 25 डिसेंबर रोजी केली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता याबाबत नवी माहिती दिली आहे. सरकार आता या डोसची आठवण करुन देणार आहे. 10 जानेवारीपासून सुरू होणारा प्रिकॉशनरी डोस घेण्याची आठवण करून देण्यासाठी सरकार पात्र वृद्ध लोकसंख्येला एसएमएस पाठवणार आहे.

तसेच, कोविड-19 लसीच्या प्रीकॉशनरी डोससाठी (precautionary dose) पात्र असणाऱ्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कॉमोरबिडीटीज (comorbidity) अपलोड करण्याची किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्राने गेल्या मंगळवारी स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांच्या मंगळवारी राज्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे 60 वर्षांवरील व्यक्ती डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय प्रीकॉशनरी डोस घेऊ शकणार आहेत. तथापि, लस घेण्यापूर्वी त्यांना त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असून, कोरोना लसीचा दुसऱ्या डोस घेतल्यानंतर नऊ महिने पूर्ण झालेले नागरिकच तिसऱ्या डोससाठी पात्र असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT