Graft with EMI touch Esakal
देश

Graft with EMI Touch: भ्रष्ट अधिकाऱ्यांची 'उदारता'... EMI सारख्या हप्त्यात घेतायत लाच; पैसे देणाऱ्यावर बोजा पडू नये दिली सुविधा

Graft with EMI touch: गुजरातमध्ये भ्रष्टाचाराची धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. याठिकाणी लाच घेणारे अधिकारी ईएमआय सारख्या हप्त्यांमध्ये लाचेचे पैसे घेत आहेत, जेणेकरून लाच देणाऱ्यावर कोणताही बोजा पडू नये. राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अशा 10 प्रकरणांची नोंद केली आहे, ज्यामध्ये हप्त्यांवर लाच घेतली जात होती.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आतापर्यंत तुम्ही कर्जाच्या ईएमआयबद्दल ऐकले असेलच, पण गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गुजरामध्ये भ्रष्ट अधिकारी देखील ईएमआयमध्ये लाच घेत असल्याची घटना समोर आल्या आहेत, जेणेकरून पीडितेला एकरकमी रक्कम देण्यापेक्षा जास्त भार सहन करावा लागू नये. गुजरातमध्ये ईएमआयसारखी लाच घेण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. 2024 मध्ये, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अशा 10 प्रकरणांची नोंद केली असून तपास सुरू केला.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी सांगितले की, ही पद्धत नवीन नाही. एसीबीचे संचालक समशेर सिंग यांनी सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये पीडित महिला काम सुरू होण्यापूर्वी पहिला हप्ता भरतात आणि त्यानंतर उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर दिली जाते.

शमशेर सिंग म्हणाले की, 'हप्त्यात' लाच घेण्याची ही पद्धत नवीन नाही. हे बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. ईएमआय प्रमाणे, लाच देणारे काहीवेळा त्यांचा विचार बदलतात आणि दुसरा किंवा इतर कोणताही हप्ता देण्याऐवजी एसीबीकडे संपर्क साधतात त्यांची तक्रार दाखल करतात.

असाच एक प्रकार मार्च महिन्यात उघडकीस आला होता. गुजरात जीएसटी अधिकाऱ्यांचे नेतृत्व करण्याचा दावा करणाऱ्यांनी अहमदाबादमधील मोबाईल शॉपीच्या मालकाकडून २१ लाख रुपयांची लाच मागितली होती. दुकानमालकाने सुरुवातीचा हप्ता म्हणून दोन लाख रुपये दिले. यानंतर त्यांनी एसीबीशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. एसीबीने सापळा रचून पहिला हप्ता घेणाऱ्या एकाला अटक केली.

एप्रिलमध्येही असाच काहीसा प्रकार उघडकीस आला होता. सुरत येथे उपसरपंच आणि तालुका पंचायत सदस्य एका शेतकऱ्याकडे 80 हजार रुपयांची लाच मागत होते. एसीबीने दोघांनाही पकडले होते. एसीबीने सांगितले की, त्याला 4 एप्रिल रोजी 35,000 रुपयांचा पहिला हप्ता घेताना पकडण्यात आले. तसेच, गांधीनगर येथे राज्य सीआयडी क्राईमच्या एका उपनिरीक्षकाला 40 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.

याशिवाय नर्मदा जिल्ह्यातील राज्य खाण आणि खनिज विभागाच्या रॉयल्टी निरीक्षकाने एका ट्रक चालकाला दोन हप्त्यांमध्ये एक लाख रुपयांची लाच मागितली होती. 60 हजार रुपये घेताना 26 एप्रिल रोजी मध्यस्थाला अटक करण्यात आली. गुजरातमधील अशा प्रकरणांवर एसीबीचे पथक लक्ष ठेवून आहे आणि गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT