चालू आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १७ हजार ५०० कोटींची तरतूद केली आहे.
बंगळूर : ‘गृहलक्ष्मी’ योजनेअंतर्गत (Gruha Lakshmi Scheme) प्रत्येक घरातील प्रमुख महिलेला प्रति महिना दोन हजार रुपये देण्याची योजना लवकरच कार्यान्वीत होईल, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांनी सांगितले.
आर्थिक सहाय्य योजनेचे अॅप तीन ते चार दिवसांत प्रसिद्ध केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत सदस्या हेमलता यांच्या प्रश्नाला उत्तर देताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन अर्ज कोणत्या तारखेपासून सादर करायचा याची माहिती देणार आहे.
चार ते पाच दिवसांत अॅप प्रसिद्ध होईल. १६ ते १७ ऑगस्टपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातील. आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून उद्घाटनाची तारीख निश्चित करू. त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे.
गृहलक्ष्मी योजनेचा वार्षिक खर्च ३० हजार कोटी असेल, असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १७ हजार ५०० कोटींची तरतूद केली आहे. निवडणुकीपूर्वी जनतेला जे आश्वासन दिले होते, त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. याबाबत कोणीही शंका घेऊ नये, अशी विनंती त्यांनी केली.
दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना स्वाभिमानाने आणि शांतीचे जीवन जगण्यासाठी सरकारकडून ही छोटीशी मदत आहे. आपल्या सरकारच्या पाच हमी योजनांपैकी गृहलक्ष्मी योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी १०९ हेल्पलाइनवर माहिती शेअर केली आहे. त्याची पद्धतशीर अंमलबजावणी केली जाईल, असे त्या म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.