नवी दिल्ली : पुढील आठवड्यापासून सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण सोमवारी, १८ जुलैपासून काही गोष्टींवरील वस्तू आणि सेवा करात वाढ होणार आहे. त्यामुळे अनेक वस्तू महागणार आहेत. अर्थात काही वस्तू आणि सेवांवरील कर कमी करण्यात येणार असल्याने त्या स्वस्तही होतील. गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या ४७व्या बैठकीत, सरकारने अनेक वस्तू आणि सेवांवर सुधारित वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचा निर्णय घेतला.
काय होणार महाग?
प्री-पॅकेज केलेले आणि प्री-लेबल केलेल्या वस्तू जसे दही, लस्सी आणि ताक यावर ५ टक्के दराने जीएसटी लागू होईल. या वस्तू पूर्वी जीएसटीच्या कक्षेतून मुक्त होत्या.
धनादेश जारी करण्यासाठी बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
रूग्णालयातील आयसीयू वगळता पाच हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे असलेल्या खोलीसाठी प्रति रूग्ण प्रतिदिन ५ टक्के कर आकारला जाईल.
नकाशे आणि आलेख कागदवर १२ टक्के जीएसटी आकारला जाईल.
- प्रतिदिन १००० रुपयांपेक्षा भाडे असलेल्या हॉटेल रूम्ससाठीही १२ टक्के कर
- एलईडी दिव्यांवर १८ टक्के कर
-चाकू, कागद कापण्याचा चाकू, पेन्सिल शार्पनर, ब्लेड, चमचे, काटे, लाडू, केक-सर्व्हर्स इत्यादींवर १८ टक्के कर
काय स्वस्त होईल?
- खासगी संस्था, व्यापाऱ्यांनी आयात केलेल्या संरक्षण दलांना पुरवल्या जाणाऱ्या विशिष्ट वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.
- रोपवेद्वारे माल आणि प्रवाशांची वाहतूक स्वस्त व्हावी यासाठी त्यावरील जीएसटीचे दर १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणले आहेत.
- मालवाहतूक भाड्यावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के
- स्प्लिंटस, फ्रॅक्चर उपकरणांसह शरीराचे कृत्रिम अवयव, इंट्राओक्युलर लेन्स आदींवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के
कॅसिनो, ऑनलाइन गेमिंगवर GST
कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि घोड्यांच्या शर्यतींवर २८ टक्के जीएसटी लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र याबाबत निर्णय न झाल्याने या सेवांवर आता तत्काळ जीएसटी लागू होणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.