नवी दिल्ली : आम आदमी पार्टीनं गोव्यात (Goa AAP) आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून अमित पालेकर (Amit Palekar) यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर पालेकर यांनी पहिली प्रतिक्रिया देताना गोव्याच्या जनतेला भ्रष्टाचारमुक्त गोव्याचं आश्वासनं दिलं आहे. (Guarantees corruption free Goa Assurance of AAP CM candidate Amit Palekar)
"भ्रष्टाचारमुक्त गोवा बनवण्याची मी तुम्हाला गॅऱंटी देतो. सर्वांच स्वप्न असलेलं गोव्याचं हरवलेलं वैभव मी पुन्हा मिळवून देईन. तुम्हाला दिलेल्या प्रत्येक शब्दाचं मी पालन करेन याचीही मी तुम्हाला गॅऱंटी देतो," असं अमित पालेकर यांनी म्हटलं आहे.
आपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार
आम आदमी पार्टीनं (AAP) पंजाबनंतर आता गोव्यातही आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यानुसार अमित पालेकर हे आता गोव्यात आपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील. आपचे राष्ट्रीय संघटक अरविंद केजरीवाल यांनी याची बुधवारी घोषणा केली. गोव्यात ४० जागांवर आप निवडणूक लढवत आहे.
कोण आहेत अमित पालेकर?
गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करताना अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, अमित पालेकर हे व्यवसायाने वकील असून ते भंडारी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. या समाजाची गोव्यात ३५ टक्के इतकी लोकसंख्या आहे. अमित पालेकर हे गोव्यातील एक प्रसिद्ध चेहरा असून सामाजिक कार्यात ते खूपच सक्रीय आहेत. अनेकदा त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवलेला आहे. पालेकर यांच्यासाठी राजकारण नवं नाही कारण त्यांची आई गोव्यातील सांताक्रूझ भागात दहा वर्षे सरपंच राहिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.