Gujarat Assembly Election 2022 esakal
देश

Gujarat : दोन दिवसांत काँग्रेसला तिसरा धक्का; आमदार भावेश यांचा राजीनामा, भाजपात जाण्याची शक्यता!

निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतश्या काँग्रेसच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अब्दाहोद जिल्ह्यातील झालोद येथील काँग्रेसचे आमदार (Congress MLA) भावेश कटारा (Bhavesh Katara) यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

विशेष म्हणजे, मोहनसिंग राठवा आणि भगवान बरार यांच्यानंतर गेल्या दोन दिवसांत राजीनामा देणारे ते तिसरे काँग्रेस आमदार आहेत. अधिकृत निवेदनात म्हटलंय की, कटारा यांनी सभापती निमाबेन आचार्य (Nimaben Acharya) यांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामा सुपूर्द केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (BJP) उमेदवारांची नावं निश्चित करण्यात व्यस्त असताना कटारा यांनी राजीनामा दिला आहे. कटारा आज भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. यापूर्वी राठवा आणि बरार यांनीही काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बरार म्हणाले होते की, त्यांनी त्यांच्या किमान 4 हजार समर्थकांशी सल्लामसलत केल्यानंतर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि भाजपची इच्छा असल्यास पुढील महिन्यात होणारी निवडणूक लढवू, असं म्हटलं.

बरार हे अहिर समाजाचे प्रभावी नेते आहेत. 2007 आणि 2017 मध्ये ते तलाला मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांचे बंधू जशुभाई हे 1998 आणि 2012 मध्येही या जागेवरून आमदार राहिले आहेत. तलाला हा गीर सोमनाथ जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला या जिल्ह्यात खातंही उघडता आलं नव्हतं, तर काँग्रेसनं चारही जागा काबीज केल्या होत्या. 2019 मध्ये विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी बरार यांना आमदारपदावरून अपात्र ठरवलं होतं. दोन दशक जुन्या बेकायदेशीर खाण प्रकरणात त्यांना स्थानिक न्यायालयानं दोन वर्षे नऊ महिन्यांची शिक्षा सुनावली होती.

याच्या एक दिवस आधी काँग्रेसचे आमदार आणि आदिवासी नेते मोहन सिंग राठवा यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. गुजरात विधानसभेसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर, 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT