सध्या देशभरात गुजरात विधानसभा निवडणूकीची रणधूमाळी सुरू आहे. अशात ताज्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये भाजपचाच विजय असल्याची स्पष्ट चिन्हे आहे. जर भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या गळ्यातच मुख्यमंत्री पदाची माळ पडणार असल्याचं स्पष्ट दिसतेय. (Gujrat Result 2022)
भुपेंद्र पटेल हे २०१७ च्या निवडणूकीत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी भाजपने ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची सुत्रे दिली होती. पण त्यानंतर २०२१ मध्ये विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यावेळी मुख्यमंत्रीपद पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांना देण्यात आले. ही संपुर्ण देशासाठी भुवया उंचवणारी गोष्ट होती. (Gujarat Assembly Election Result Narendra Modi bjp master stroke read how Bhupendra Patel become cm )
भुपेंद्र पटेल यांच्या विषयी अधिक जाणून घ्या
भुपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या घाटलोडीया विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवली. सिव्हील इंजीनिअर असलेले ६० वर्षीय पटेल हे अहमदाबादच्या शिलाज येथील रहीवासी आहे. ते पाटीदार समाजाचे नेते म्हणून विशेष ओळखले जातात.
भुपेंद्र पटेल यांची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे. त्यांनी तळागळात काम केले. सामाजिक आणि राजकीय चळवळीत ते नेहमी सहभागी व्हायचे. १९९९-२००० मध्ये ते मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते तर २०१० ते २०१५ या कार्यकाळात ते थलतेज वॉर्डातून नगरसेवक होते.
त्यानंतर २०१५-१७ मध्ये ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष राहले. गेल्या २०१७ विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा आमदारकीच्या शर्यतीत उतरले आणि चक्क पहिल्यांदाच निवडून आले. त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुद्धा जबाबदारी स्वीकारली.
ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांनी २०२१ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री पदी कोण येणार अशी चर्चा होती त्यावेळी भाजपने एक नवा चेहरा समोर आणला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तो चेहरा होता भुपेंद्र पटेल यांचा. भुपेंद्र पटेल हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना थेट मुख्यमंत्री पद देणे हे न पचण्यासारखं होतं.
पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या भुपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री का बनविले ?
असं म्हणतात, २०१७ च्या निवडणूकीच्यावेळी भाजपसमोर पाटीदार आंदोलन हे खूप मोठं आव्हान होतं पण या निवडणूकीत पाटीदार समाजाला आपल्या बाजूला आणायचं असेल तर पाटीदार समाजाचा एक असा उमदा चेहरा आपल्यासोबत असावा जेणेकरुन २०२२ ची निवडणूक सोपी जाईल अशी चाल भाजपची होती. त्यामुळे निवडणूकीला फक्त एक वर्ष बाकी असताना विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आणि त्या जागी पाटीदार समाजाचे मुख्य नेते भुपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री बनविले.
गुजरात हा कायमच भाजपचा गड राहीला आहे. या निवडणूकीतही भाजप आपली सत्ता कायम ठेवणार आहेत. त्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहराही कायम राहील, हे ठरलेलं आहे. त्यामुळे भूपेंद्र पटेल हे येणाऱ्या दिवसात गुजरातच्या भवितव्याची सुत्रे आपल्या हाती घेऊन गुजरातची प्रगती कितपत करतात, हे पाहणे गरजेचे राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.