crime news NCB action seizes drugs 4 smugglers arrested mumbai  Sakal
देश

गुजरातमध्ये पुन्हा हजारो कोटींचं ड्रग्ज जप्त! ATSची मोठी कारवाई

गुजरात हे भारतातील बेकायदा ड्रग्ज तस्करीचं प्रमुख केंद्र बनल्याचं चित्र आहे.

सकाळ डिजिटल टीम

वडोदरा : गुजरात हे भारतातील बेकायदा ड्रग्ज तस्करीचं प्रमुख केंद्र बनल्याचं चित्र आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा हजारो कोटी रुपयांचे विविध प्रकारचे ड्रग्ज गुजरातच्या बंदरांवरुन जप्त करण्यात आलं आहे. त्यात पुन्हा एकदा नव्यानं ड्रग्ज पकडण्यात आलं आहे. गुजरात एटीएसनं ही कारवाई केली यामध्ये १,१२५ कोटी रुपयांचं मेफेड्रोन जप्त केलं आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन अशाच एका कारवाईत १२०० कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं होतं. (Gujarat ATS recovers 225kg of mephedrone worth ₹ 1125 cr six detained)

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं वडोदऱ्यातील एका बांधकाम सुरु असलेल्या फॅक्टरीवर मंगळवारी छापा टाकला इथून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. यामध्ये २२५ किलो मेफेड्रोन ज्याची किंमत १,१२५ कोटी रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ लोकांनाही ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती गुजरात एटीएसचे पोलीस अधीक्षक सुनील जोशी यांनी दिली.

जोशी यांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेलं अंमलीपदार्थ भरुच येथील गुजरात औद्यागिक विकास महामंडळ अर्थात GIDC सायखा इथल्या एका केमिकल कंपनीमध्ये तयार करण्यात आलं आहे. ज्या फॅक्टरीमधून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे ते सुरत येथील महेश वैश्नव आणि वडोदरा येथील पियूष पटेल नामक व्यावसायिकांच्या मालकीचं आहे. तसेच राकेश मकानी, विजय वसोया आणि दिलीप वघासिया हे भरुच इथल्या प्रकल्पाचे मालक आहेत. या सर्व प्रकल्पाच्या मालकांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT